Swara Bhasker | (Instagram)

राजकारणात आपलं एक ठाम मत असणाऱ्या आणि संधी मिळताच ते बोलून टाकणाऱ्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिचं नाव नेहमीच हिट असतं. मागील काही काळात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) सुद्धा स्वराने आपली भूमिका मांडत विविध माध्यमातून आपली बाजू स्पष्ट केली होती, आपल्या म्हणण्याला समोर आणण्यासाठी तिने विद्यार्थी चळवळीत सुद्धा भाग घेतला होता. याचाच एक भाग म्ह्णून अलीकडेच एक वाहिनीवर स्वराने हिंदुस्थान शिखर संगम या कार्यक्रमात हजेरी लावली आणि नेहमीप्रमाणे CAA, NPR आणि NRC बाबत आपली मते मांडली, मात्र स्वरा च्या विरुद्ध बोलत असताना जेव्हा या शोच्या निवेदिकेने 2010 मधील एक विधान केले तर ओघाओघात स्वराच्या तोंडून तेव्हा तर मी केवळ 15 वर्षांची होते असे वाक्य निघून गेले. बस्स! हे वाक्यच आता नेटवर इतके गाजत आहे की चक्क त्यावरून आता #MathematicianSwara हा हॅशटॅग सुद्धा तुफान व्हायरल होऊ लागलाय.

स्वराच्या या विधानाचा व्हिडीओ शेअर करत काही जणांनी स्वारीच्या गणित ज्ञानावरच सवाल उचलला आहे. वास्तविक तिचा जन्म हा 1988 सालचा आहे आज या दिवशी स्वरा 31 वर्षाची आहे मग 2010 ला तिचे वय केवळ 15 वर्ष कसे काय असा नेटकऱ्यांचा प्रांजळ प्रश्न आता मात्र मिम्स आणि ट्रोल्सच्या माध्यमातून स्वरालाच मनस्ताप होऊन बसला आहे, या एका विधानावरून व्हायरल झालेले काही ट्विट्स आता आपण पाहणार आहोत. 'मुघलांनी भारत श्रीमंत केला' या ट्विट वरून स्वरा भास्कर झाली ट्रोल

स्वरा भास्कर Trolled

दरम्यान, या शो मध्ये अनेक मुद्द्यांवर स्वरा अनुत्तरित झालेली सुद्धा पाहायला मिळाली. CAA किंवा NRC वर बोलत असताना तिच्या मुद्द्यांना खोदून काढल्याने तिने रागात सर्व प्रेक्षक वर्ग हा उजव्या विचाराचा आहे आणि म्ह्णून ते टाळया वाजवताईत असेही म्हंटले होते, अर्थात स्वरासाठी ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही मात्र आता या सर्व ट्रॉलर्सना ती काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.