'मुघलांनी भारत श्रीमंत केला' या ट्विट वरून स्वरा भास्कर झाली ट्रोल
Swara Bhaskar (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. आता नुकतेच केलेल्या नव्या ट्विटवरून स्वरा भास्कर पुन्हा वादात अडकली आहे. 'मुघालांनी भारत श्रीमंट केला' असा आशयाचं एक ट्विट स्वरा भास्करने केलं आहे. त्यानंतर ट्विटरकरांनी स्वरावर निशाणा साधत टीका केली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करमे ट्वीट सोबत एक लेख शेअर केला आहे. या लेखात लेखकाने 'मुघल जरी राज्य करण्याच्या उद्देशाने भारतात आले असले तरी त्यांच्यामुळे आपल्या जीवनमानात बदल झाले. व्यापाराला चालना दिली, वाहतूक व्यवस्था सुधारली.' असं म्हटलं आहे. हा लेख शेअर करताना स्वराने मुघालांमुळे आपली स्थिती सुधारली असं म्हटलं आहे. मात्र या ट्वीटनंतर सोशल मीडियावर स्वरा ट्रोल होण्यास सुरूवात झाली आहे. स्वरा भास्करने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले ट्रोल, नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर टीका

स्वराचं ट्विट

स्वरा भास्करने फॅक्ट आणि हिस्ट्री असे दोन हॅशटॅग वापरत हे ट्विट केलं आहे.

स्वराला ट्रोल करणारे ट्विटकरी

स्वरावर निशाणा साधताना अनेक ट्विटरकरांनी मुघलांनी भारत देशाला कसं लुटलं याचं उदाहरण दिलं आहे. अनेकांनी दाखले देत स्वराला समजावलं आहे. त्यानंतर काही काळ #Mughals हा हॅशटॅग देखील ट्रेंड झाला होता.