Faraaz Khan Is Battling For Life: राणी मुखर्जी च्या 'Mehndi' चित्रपटातील अभिनेता फराज खान ICU मध्ये दाखल, पूजा भट्ट ने चाहत्यांकडे केली मदतीसाठी अपील
Faraaz Khan (Photo Credits: Facebook)

90 च्या दशकात चॉकलेट बॉय म्हणून बराच चर्चेत आलेला अभिनेता फराज खान (Faraaz Khan) सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. राणी मुखर्जी हिचा 1998 साली आलेला आणि प्रचंड गाजलेला मेहंदी (Mehndi) या चित्रपटात फराज खान ने तिच्या नव-याची भूमिका केली होती. हा अभिनेता ICU मध्ये उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहे. रिपोर्टनुसार, तो बंगळूरुच्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर झाला असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या उपचारासाठी याआधीच त्याच्या कुटूंबाने बराच पैसा खर्च केला आहे. त्यात आणखी 25 लाख रुपये आणखी लागणार आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने पूजा भट्ट (Pooja Bhatt)  हिने सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मदतीची मागणी केली आहे.

यासंबंधीचा एक व्हिडिओ पूजा भट्ट हिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. फराज खान याचा छोटा भाऊ तसेच अभिनेता फहमान खान ने लोकांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. Seema Deo Health Update: Alzheimer शी लढत असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारासाठी लेक अजिंक्य देव यांनी केलं चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन; जाणून घ्या नेमका हा आजार काय?

अभिनेत्री पूजा भट्ट ने चाहत्यांना फराज खान साठी पैशाच्या स्वरुपात मदत करण्याची विनंती केली आहे. तसेच या पोस्ट ला शेअर करा असे आवाहनही केले आहे.

फराज खान चा भाऊ फहमान खानने ईटाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, फराज मागील 5 दिवसांपासून वेंटिलेटरवर आहे आणि तो वाचण्याची केवळ 50% खात्री आहे. त्याच्यावर उपचाराचा परिणाम हळूहळू होत आहे. मात्र आता त्यांना पुढील उपचारासाठी 25 लाख रुपयांची गरज आहे. त्यात आतापर्यंत केवळ 2 लाख रुपये जमविण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांना पुढे येऊन आम्हास मदत करावी असे आवाहन त्याने केले आहे.