Lock Upp: पतीचा बेदम मार खाणारी अभिनेत्री Nisha Rawal बनली 'लॉक अप'ची पहिली कंटेस्टेंट, पहा प्रोमोची झलक
Lock Upp First Contestant Nisha Rawal (PC - Instagram)

Lock Upp First Contestant: कंगना रनौतचा आगामी कॅप्टिव्ह रिअॅलिटी शो 'लॉक अप' त्याच्या अनोख्या फॉरमॅटमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. कंटेंट क्वीन एकता आर कपूर हा निर्भीड रिअॅलिटी शो भारतीय प्रेक्षकांसाठी आणण्यासाठी सज्ज आहे. जो 27 फेब्रुवारीपासून Alt Balaji आणि MX Player वर विनामूल्य प्रसारित होणार आहे. शोच्या वाढत्या प्रतिक्षेदरम्यान, निर्मात्यांनी आता 'लॉक अप' च्या पहिल्या सेलिब्रिटी स्पर्धकाची घोषणा केली आहे. स्पर्धकांच्या नावावर बराच काळ सस्पेन्स असताना, या गेमचा भाग बनण्याचे धाडस कोण करेल? अशी अटकळ बांधली जात होती. पण आता प्रतीक्षा संपली असून टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल निशा रावल (Nisha Rawal) 'लॉक अप'ची पहिली स्पर्धक असणार हे निश्चित झाले आहे.

निशा रावल ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जिने 'मे लक्ष्मी तेरे आंगन की' या टीव्ही मालिकेत तिच्या अभिनयामुळे लोकप्रियता मिळवली. अशा साहसी आणि थरारक शोमध्ये येण्यासाठी निशा खूप उत्साहित आहे. या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने म्हटलं आहे की, “मी या नवीन आणि आव्हानात्मक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेला किंवा ऐकला हा शो भारतीय ओटीटी उद्योगात एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल. प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट असेल. याचा एक भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. तसेच, एक अनोखा रिअॅलिटी शो लाँच केल्याबद्दल Endemol, ALTBalaji आणि MX Player चे खूप खूप अभिनंदन!” (वाचा - Kareena Kapoor in Tv Serial: करीना कपूर चित्रपट सोडून टीव्हीमध्ये करणार पदार्पण? ‘स्पाई बहू’ शो चा प्रोमो रिलीज करत मेकर्सने सांगितलं सत्य)

विशेष म्हणजे हा शो बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत होस्ट करणार आहे. यामध्ये 16 वादग्रस्त सेलिब्रिटींना महिनाभर तुरुंगात टाकण्यात येईल. हा शो 27 फेब्रुवारी 2022 रोजी प्रीमियर होणार आहे. Alt Balaji आणि MX Player त्यांच्या संबंधित प्लॅटफॉर्मवर शो 24×7 लाइव्ह स्ट्रीम करतील आणि दर्शकांना स्पर्धकांशी थेट संवाद साधण्याची परवानगी देखील देतील.