Kareena Kapoor in Tv Serial: करीना कपूर चित्रपट सोडून टीव्हीमध्ये करणार पदार्पण? ‘स्पाई बहू’ शो चा प्रोमो रिलीज करत मेकर्सने सांगितलं सत्य
Spy Bahu (PC - Instagram)

Kareena Kapoor in Tv Serial: करीना कपूर (Kareena Kapoor) ने अलीकडेच एका टीव्ही सीरियलचा प्रोमो शूट केला. त्यानंतर ती छोट्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 'स्पाई बहू' (Spy Bahu) असे या शोचे नाव आहे. निर्मात्यांनी शोचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये करीना कपूर कथा कथन करणाऱ्या निवेदकाची भूमिका साकारत आहे. आता तिला पाहून, ती टीव्हीवर अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे की नाही या गोंधळात पडू नये, यामुळे निर्मात्यांनी प्रोमोसह एक डिस्क्लेमर देखील चालवला आहे. यात त्यांनी स्पष्ट केलं की करीना या शोमध्ये अभिनय करताना दिसणार नाही.

कलर्स टीव्हीने आपल्या इंस्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये शोची कथा सांगण्यात आली आहे. करीना कपूरने सर्व पात्रांची ओळख करून दिली. ती म्हणते, 'जगातील प्रत्येक प्रेमकहाणी अशी सुरू होते. सेजल आणि योहान सारखी मुलं-मुली भेटतात.' या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात हे दाखवण्यात आले आहे. (वाचा - Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding: फरहान अख्तर-शिबानी दांडेकर अडकले विवाहबंधनात (See Photo))

करीना पुढे म्हणते, 'पण प्रत्येक प्रेमात काही ना काही रहस्ये दडलेली असतात. या अडचणींमध्ये एका गुप्तहेराची प्रेमकहाणी कशी पूर्ण होईल.’ प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, सेजल योहानच्या खिशात काही गुप्तचर उपकरणे ठेवते आणि तिचे त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

स्पाय बहूची कथा दोन तरुण जोडप्यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. सेजल गुप्तहेर आहे आणि योहान हा संशयित दहशतवादी आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कलर्सने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सेजल योहानच्या हृदयाच्या तारांमागे अनेक खोल रहस्ये दडलेली आहेत. गुप्तहेराची प्रेमकथा पूर्ण होईल का?'

यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, करीना कपूर या शोमध्ये काम करणार आहे. मात्र आता मेकर्संनी यासंदर्भात खुलासा केला आहे.