अभिनेत्री-खासदार Nusrat Jahan यांचा धक्कादायक खुलासा; Nikhil Jain सोबत नाते तुटले, पतीवर केले आर्थिक फसवणुकीचे आरोप
Kolkata: Actress Nusrat Jahan with her husband Nikhil Jain. (Photo Credits: IANS)

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) यांनी पती निखिल जैन (Nikhil Jain) यांच्याशी नाते तुटल्याची कबुली दिली आहे. हे दोघेही खूप आधी वेगळे झाले असून, आता नुसरत यांनी स्पष्टीकरण देणारे निवेदन जारी केले आहे. या निवेदनात नुसरत यांनी त्यांचे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर होते, असे म्हटले आहे. नुसरत म्हणाल्या की, त्यांचे व निखिल जैन यांचे लग्न तुर्कीच्या कायद्यानुसार झाले होते आणि भारतामधील कायद्यानुसार हे लग्न वैध नाही. त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उद्भवत नाही. गेल्या काही दिवसांपासून नुसरत आणि पती निखल जैन विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत, त्यावर आता नुसरत यांनी मौन सोडले आहे.

नुसरत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचा विवाह भारतीय कायद्यानुसार वैध नसल्यामुळे घटस्फोटाचा प्रश्न उद्भवत नाही. कायद्यानुसार हे लग्न नसून लिव्ह-इन रिलेशनशिप सारखे आहे व हे दोघेही फार आधीच विभक्त झाले आहेत.

नुसरत यांनी नावाचा उल्लेख न करता निखिल जैनवर अनेक आरोप केले आहेत. त्या म्हणतात, निखिलने त्यांच्या बँक खात्यातून अवैधपणे पैसे काढले आहेत. नुसरत असा दावा करतात की, विभक्त झाल्यानंतरही रात्री उशिरा त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेले आहेत, त्याबद्दल त्या पोलिसांत तक्रारही दाखल करणार आहेत. तसेच नुसरत यांनी सांगितले आहे की, त्यांच्या अनेक मौल्यवान गोष्टी अद्याप निखिलच्या घरी आहे. तसेच त्यांचे सर्व दागिनेही निखिलकडेच आहेत, जे त्यांना कुटुंबातील सदस्यांनी दिले होते. (हेही वाचा: Vicky Kaushal आणि Katrina Kaif रिलेशनशिपमध्ये? Harshvardhan Kapoor ने केला महत्त्वपूर्ण खुलासा)

नुसरत यांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर त्यांच्या सर्व कौटुंबिक खात्याचा तपशील निखिलला देण्यात आला होता. त्याने माझ्या माहिती व संमतीशिवाय माझ्या बर्‍याच खात्यांचा गैरवापर केला आहे. मी अजूनही यासंदर्भात बँकांशी बोलत आहे आणि गरज पडल्यास याचा पुरावा मी सादर करेन.

बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी टीएमसी खासदार नुसरत जहां यांचे गरोदरपण आणि त्यांचे पतीशी असलेल्या संबंधांबद्दल एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर याबाबत चर्चा सुरु झाली. मीडिया रिपोर्टनुसार नुसरत जहां 6 महिन्यांच्या गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे. निखील जैन यांच्या म्हणण्यानुसार 2020 पासून नुसरत त्यांच्या आई-वडिलांच्या घरी राहत आहेत, अशा परिस्थितीमध्ये हे मूल त्यांचे कसे असेल. रिपोर्टनुसार, नुसरत यश दासगुप्ताला डेट करत आहेत, जो 2021 बंगालमधील निवडणुकीत भाजपाचा उमेदवार होता. मात्र अद्याप यावर दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.