Sidharth Shukla | Photo Credits: Facebook)

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन (Sidharth Shukla Passes Away) झाले आहे. तो 40 वर्षांचा होता. हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ ((Sidharth Shukla ) याचे निधन झाले. गेली प्रदीर्घ काळ तो मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होता. खास करुन बिग बॉस (Big Boss) या खासगी मनोरंजन वाहिनीवरुन प्रसिद्ध होणाऱ्या रिअॅलीटी शोमधून तो अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला. दरम्यान, सिद्धार्थ याचे पार्थीव कूपर रुग्णालयात आहे. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा सुरु असल्याची माहिती आहे. सिद्धार्थ शुक्ला हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव होते. सोशल मीडियावरही तो अधिक कार्यरत असे.

सिद्धार्थ शुक्ला याचा जन्म मुंबईत झाला होता. सुरुवातीपासूनच मॉडेलींग, मनोरंजन, अभिनय आदी विषयात त्याला आवड होती. तो नेहमी आपल्या व्यवसायाचा विचार करत असायचा असे त्याचे निकटवर्तीय सांगतात.

ट्विट

व्यायामाने कमावलेले शरीर, आकर्षक देहयष्टी यामुळे तो अनेकांना आकर्शित करत असे. सोशल मीडिया आणि अनेक रिअॅलिटी शोमध्येही त्याच्या बॉडीची चर्चा असे. आकर्शक लुक्समुळे तो पेज थ्रीवर नेहमी झळकत असे. 2004 मध्ये आपल्या आईच्या आग्रहाखातर त्याने एका मॉडेलींग स्पर्धेत भाग घेतला. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी तो कोणताही पोर्टफोलियो न घेताच पोहोचला होता. तरीही निवड समितीने त्याला पाहून त्या स्पर्धेसाठी निवडले.