ABCD Fame Choreographer Kishore Shetty (PC - Instagram)

Kishore Shetty Arrested: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Case)ड्रग अँगल समोर आल्याने एनसीबीकडून (Narcotics Control Bureau) कडून तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यानंतर रियाने चौकशीदरम्याने बॉलिवूडमधील अनेकांची नावे घेतली.

त्यानुसार, एनसीबीने विविध ठिकाणी छापे टाकून अनेक ड्रग्स पेडलर्सला ताब्यात घेतलं. अशातचं आता मंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने (CCB) आज ड्रग्ज प्रकरणात कोरिओग्राफर किशोर शेट्टीला (Choreographer Kishore Shetty) अटक केली आहे. ड्रग्ज बाळगण्याचा आरोप करत एनसीबीने किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टीविरोधात नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट (NDPS Act) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत ची बहिण मीतू ने आपल्या आई-भावाचा एक सुंदर चित्र पोस्ट करुन म्हणाली 'माझा भाऊ माझा गर्व होता')

दरम्यान, किशोर शेट्टी हा एक प्रसिद्ध डान्सर असून उत्तम कोरिओग्राफर आहे. त्याने दिग्दर्शक रेमो डिसुझाच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमुळे किशोर शेट्टीला प्रसिद्धी मिळाली होती. सुशांत सिंह राजपूतला मृत्युपूर्वी अंमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.