Bigg Boss Season 13, October 6 Weekend War: घरातील सदस्यांनी एकमेकांच्याबाबत असलेले मत मांडत फोडले भ्रमाचे फुगे, पहिल्या विकेंडच्या वारमध्ये सर्व सदस्य सुरक्षित
बिग बॉस 13 (Image Credit: Colors/Twitter)

बिग बॉसच्या घरातील पहिल्या विकेंडच्या वार मध्ये सुरुवातीला आरती ही देवोलिना सोबत तिच्या वागण्याबाबत स्पष्टीकरण देते. यानंतर सलमान खान सदस्यांची संवाद साधत प्रथम अन्नु मल्लिक याला गाणे गायला सांगतो. यावर सलमान आम्हाला यंदाच्या सीझनचा ढिंच्याक पुजा मिळाल्याची थट्टा करतो. सदस्यांना एक टास्क दरम्यान लव्ह लेटर, चेतावनी लेटर आणि एक संदेश लेटर लिहिण्यास सांगण्यात आले होते. घरातील सदस्यांपैकी शेफाली बग्गा आणि सिद्धार्थ डे यांच्यासह शेफाली आणि पारस यांच्यामध्ये प्रेमाची कळी फुलत असल्याचे दिसून येत आहे.

दुसऱ्या बाजूला स्टोरेज रुममध्ये फुगे ठेवले असतात ते डोक्यात घालण्यासाठी दिले जातात. हाच आजचा टास्क असून घरातील सदस्यांना एकमेकांच्या चुका सांगण्यास सांगतात. परंतु सिद्धार्थ डे याच्यावर घरातील बहुतांश सदस्यांकडून राग व्यक्त करत त्याच्या चुका सांगण्यात येतात. दरम्यान सदस्यांनी केलेल्या टीकेमुळे सिद्धार्थ मला या शो मध्ये राहायचे नाही असे म्हणतो. अन्य सदस्यांच्या कामाबाबत वादग्रस्त केलेल्या टिप्पणीवरुन रश्मी कडून संताप व्यक्त केला जातो. सुलतान आखाड्यात आज सिद्धार्थ डे आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यामध्ये होतो. दरम्यान शेहनाज ही या टास्कदरम्यान उठून जाते. परंतु या कुस्तीच्या टास्कमध्ये सिद्धार्थ शुक्ला याचा विजय होतो. यापूर्वीच्या सीझन मधून झळकलेली हिना खान हिची आज घरात एन्ट्री होते. तर आज कोणताही सदस्य घरातील जाणार नसल्याचे सलमान खान स्पष्ट करतो.(Bigg Boss 13 बंद करण्याची मागणी; भाजपा नेत्यासह प्रेक्षकांनी ट्विटर वरून व्यक्त केला संताप, 'हे' आहे कारण)

बिबि सुपर मार्केट मध्ये जाण्यासाठी प्रथम देवोलिना हिला पाठवले जाते. तेथे तिची हिना खान हिच्यासोबत भेट होताच दोघी आनंद व्यक्त करतात. परंतु सुपर मार्केटमधील एकच वस्तू किंवा घरातील सदस्याच्या मेसेज ऐकायचा ऑप्शन दिला जातो. पण सिद्धार्थ त्याच्या बहिणीचा मेसेज ऐकणे पसंद करतो.  अशा प्रकारे अन्य सदस्यांना सुद्धा संधी दिली जाते. तर तीन आठवड्यातच यंदाचा बिग बॉसचा सीझन उरकला जाणार आहे.