Bigg Boss Marathi 2 Day 10 Episode Preview: ...आणि किशोरी शहाणे ढसाढसा रडल्या, जाणून घ्या वादाचं कारण
Kishori Shahane (Photo Credits: Twitter)

बिग बॉस (Bigg Boss Marathi)  मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या सुरवातीपासूनच शांत व समंजस पवित्रा स्वीकारलेल्या किशोरी शहाणे (Kishori Shahane) या येत्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्या वीकेंडच्या डावानंतर घरातील जुन्या टीम रद्द करून रहिवाशी मंडळींना नव्या गटात विभागले गेले. कालच्या भागामध्ये घरातील मंडळींना चोर बाजार असे नवे टास्क देण्यात आले आहे.  या टास्क दरम्यान शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि किशोरी शहाणे  यांच्यात जोरदार भांडण झाल्याने किशोरी यांच्या अश्रूंचा बांध फुटला असे सध्या समजत आहे.

आजच्या भागात काय घडणार पहा..

चोर बाजार या टास्क दरम्यान शिवानी पुन्हा पुन्हा किशोरी शहाणे यांच्या सामानाचा कप्पा उघडत असल्याने या वादाला सुरुवात झाली.यावरून किशोरी शहाणे शिवानीला 'सायको' देखील म्हणाल्या. त्यानंतर शिवानीनं 'हो, आहेच मी सायको' म्हणत वादात आणखीन भर घालायला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या मैत्रिणीसमोर बोलत असताना 'किशोरी शहाणे असतील ते त्यांच्या घरी, माझ्यासमोर आवाज नाही करायचा' असंही शिवानी म्हणाली. Bigg Boss Marathi 2: अभिजित बिचुकले कधी नव्हे ते भडकले, ओली चड्डी घेऊन घरभर फिरले

दरम्यान आतापर्यंत शांत असणाऱ्या किशोरी यांचे देखील रौद्र रूप भांडणात पाहायला मिळाले. आपले सामान वारंवार घेऊन आपल्याला टार्गेट केलं जात आहे असं म्हणत किशोरी रडायला लागल्या. त्यावेळी अभिजीत बिचुकले यांनी किशोरी यांची मनधरणी करायला पुढाकार घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच आपण घरातल्या इतर मंडळींना विनंती करून किशोरी यांचं सामान परत करण्यास सांगणार असल्याचे आश्वासन देखील बिचुकले देताना पाहायला मिळत आहेत.