Bigg Boss Marathi 2, 24th June, Day 29 Updates: घरात फुलतोय प्रेमाचा त्रिकोण, एकमेकांचा अपमान करत निवडला गेला या आठवड्यातील नवीन कॅप्टन
Bigg Boss Marathi 2, 24th June (Photo Credit : Colors Marathi)

Bigg Boss Marathi 2, Episode 30 Highlights: वीकएंडच्या डावानंतर आजच्या भागाची सुरुवात रडारडीने होते. नेहा, वैशाली आणि हीना ओक्साबोक्सी रडताना दिसतात. दुसरीकडे पराग, वीणा, किशोरी आणि रुपाली यांचा ग्रुप परत एकत्र येत असलेला दिसून येतो. महेश मांजरेकरांनी घेतलेल्या शाळेचा काही फायदा झालेला आहे. सकाळी वीणा आणि रुपाली घरातल्या सर्वांबद्दल आपले विचार डिस्कस करतात. वीणा घरातील प्रत्येक सदस्याबद्दल तिला काय वाटते ते सांगते. यावेळी ती तिचा परागवर विश्वास नसल्याचे ठसकावून सांगते.

हीनाने घरातील सर्व पुरुषांना आपल्याकडे आकर्षित केले असल्याचे स्पष्टपणे जाणवते. शिव नंतर परागही काहीतरी कारण काढून मुद्दाम हीनाशी बोलताना दिसतो. मात्र शिव आणि हीनाची केमिस्ट्री म्हणजे 'डाल मे कुछ काला है' टाईपची आहे हे पाहून, पुन्हा एकदा सर्वजण शिवला हीनावरून चिडवतात. दुसरीकडे किशोरीला वीणा आणि रुपाली ज्याप्रमाणे तिच्याशी बोलतात ते आवडत नसल्याचे ती बोलून दाखवते. (किशोरीची बाहेर एक इमेज आहे, मात्र वीणा आणि रुपाली तिला ‘डोक्यावर पडलीस काय?’ अशी वाक्ये बोलून अपमान करत असतात.)

दरम्यान, हीना नेहाजवळ शिवबद्दल आपल्याला काय वाटते ते बोलून दाखवते. एकूणच हीनालादेखील शिव आवडत असल्याचे दिसते. इतक्यात वैशालीचा कप्तानपदाचा कार्यकाळ संपल्यावर, घरातील नव्या कप्तानपदासाठी ‘मनोरा विजयाचा’ हे कार्य दिले जाते. हा सामना शिव आणि किशोरी यांच्यामध्ये खेळला जाणारा आहे. (हेही वाचा: विद्याधर जोशी उर्फ बाप्पा बिग बॉस मराठी 2 च्या घरातून बाहेर)

टास्क सुरु झाल्यानंतर किशोरी आणि शिव प्रत्येक सदस्याला स्वतःला समर्थन देण्यासाठी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या फोटोच्या ठोकळ्यांचा मनोरा रचून तो पडण्यापासून वाचवणे हा टास्क आहे. समर्थन दिलेले सदस्य एकमेकांच्या विरुद्ध खेळू लागतात. यादरम्यान अभिजित रुपालीचा ‘पचकी’ असा उल्लेख करतो. या वरून रूपालीचा आपला त्रागा व्यक्त करते. अखेर सदस्यांच्या प्रयत्नानंतर या टास्कमध्ये शिव विजेता ठरतो. याचाच अर्थ पुन्हा एकदा शिव या घराचा कप्तान झाला आहे. मात्र आता हीनामुळे शिव आणि वीणामध्ये समस्या निर्माण होत आहेत. हीना आणि शिवची जवळीक आता वीणाला काही प्रमाणात खटकू लागल्याचे दिसत आहे. आता या प्रेमाच्या त्रिकोणात नक्की कोणाचा फायदा होईल हे लवकरच कळेल.