Bharat Poster: सलमान  खान  आणि कॅटरिना कैफ च्या ‘इंटेन्स लूक’ मधील ‘भारत’ सिनेमाचं नवं पोस्टर
Bharat New Poster (Photo Credits: twitter)

Bharat Ka Vaada New Bharat Poster: सलमान खान (Salman Khan), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अली अब्बास (Ali Abbas Zafar) जफर हे त्रिकुट यंदा ईद्च्या मुहूर्तावर ‘भारत’ (Bharat) सिनेमा घेेेेऊन रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये सलमान आणि कॅटरिना कैफ प्रमुख भुमिकेत असून आज ‘भारत’ सिनेमाचं पाचवं आणि खास पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. पिरिएड फिल्म असणारा ‘भारत’ सिनेमा 'Ode to My Father' या कोरियन सिनेमाचा रिमेक आहे. Bharat New Poster: सलमान खान आणि कतरिना कैफ यांची झलक असलेले 'भारत' सिनेमाचे नवे पोस्टर आऊट

भारत सिनेमाचं खास पोस्टर

भारत  सिनेमाच्या या पाचव्या पोस्टमध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफचा इंटेंस लूक दाखवण्यात आला आहे. भारत सिनेमामध्ये सलमान खानचा वयाच्या विविध टप्प्यांवरील वेगळे लूक डिझाईन करण्यात आले आहेत. सिनेमामध्ये भारत स्वतंत्र्य होण्याच्या लढ्यातील विविध टप्प्यांसोबत एका भारतीयाचं बदलणारं आयुष्य यावर सिनेमाची कहाणी आधारित आहे. यापूर्वी सलमान खाचा नेव्ही युनिफॉर्म, पेपर अ‍ॅन्ड सॉल्ट लूक तसेच 90 वी मधील यंग लूक पोस्टरच्या माध्यमातून शेअर करण्यात आला आहे. Bharat Movie Teaser: धर्मनिरपेक्ष भारतीयांना विचार करायला लावणार सलमान खानचा 'भारत'

‘ भारत’ सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर या दिग्दर्शकाने त्याच्याफिल्मी करियर्मध्ये अद्याप एकही फ्लॉप सि नेमा दिलेला नाही. सलमान खानला सोबत भारत हा त्याचा सलग तिसरा सिनेमा आहे. ‘सुलतान’आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन सुपरहिट्स नंतर सलमान आणि अलीच्या जोडीच्या सिनेमांची हॅट्रिक होणार का? याकडे सलमानच्या चाह्त्यांचे लक्ष लागले आहे. ‘भारत’ सिनेमाचा ट्रेलर 24 एप्रिल दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.