प्रसिद्ध संगीतकार आणि इंडियन आयडॉलचे (Indian Idol) परीक्षक असणारे अनु मलिक (Anu Malik) यांची पुन्हा एकदा शो मधून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे. अनु मलिक यांनी परीक्षकाची जबाबदारी यापुढेही पार पाडावी की नाही याबद्दल सोनी वाहिनी फेरविचार करत असल्याचे समोर आले आहे.
अनु मलिक यांच्यावर वास्तविक मागच्या वर्षीच 'मी टू' (MeToo) मोहिमे दरम्यान लैंगीक शोषणाचे आरोप लावण्यात आले होते. तेव्हा ते इंडियन आयडॉल 10 चे परीक्षक म्हणून कार्यरत होते. आरोप लावले गेल्यानंतर त्यांना तो शो सोडावा लागला होता. त्यांच्या ऐवजी जावेद अली यांना परीक्षक म्हणून पाचारण करण्यात आले होते. सोना महापात्राने त्यांच्यावर आरोप केले होते. पण आरोप सिद्ध झाले नाहीत. 11 वं पर्व सुरु झालं आणि मलिक पुन्हा रुजू झाले. पण हे काही सोना महापात्राला पटले नाही. तिने काही दिवसांपूर्वी सोनीला लिहिलेल्या एका खुल्या पात्रात याबाबत जाब विचारला होता. तसेच नेहा भसीन या गायिकेनेही तिला आलेल्या कटू अनुभवाची साक्ष देत सोनाला पाठिंबा दिला होता. (हेही वाचा. अनू मलिक वर प्रसिद्ध गायिकेने केला लैंगिग शोषणाचा आरोप; त्या प्रसंगाबद्दल वाचून तुम्हालाही बसेल धक्का)
यावर कार्यवाही म्हणून सोनी वाहिनीने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वर्षभरात वाद निवळला असल्या कारणाने अनु मलिक यांना पुन्हा एकदा परिसक्षपदी नेमण्यात आले होते, पण आता हा वाद पुन्हा उफाळून आल्या कारणाने जोपर्यंत हे प्रकरण पूर्णत्वाला जात नाही तोवर अनु मलिक याना दूर ठेवायचे असा निर्णय सोनीने घेतला आहे. .