अनू मलिक वर प्रसिद्ध गायिकेने केला लैंगिग शोषणाचा आरोप; त्या प्रसंगाबद्दल वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Anu Malik (Photo Credits: Facebook)

प्रसिद्ध संगीतकार अनू मलिक (Anu Malik) यांच्यावर #MeToo चळवळीत लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. आणि आता पुन्हा एकदा ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण प्रसिध्द गायिका नेहा भसीन हिनं अनू मलिकवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

काही दिवसांपूर्वी गायिका सोना मोहापात्रा हिने अनू मलिक यांच्याविषयीच्या बातम्यांचे फोटो शेअर करत त्यावर नाराजी व्यक्त केली होती. अनू मलिक हे वर्षभरातच पुन्हा छोट्या पडद्यावर कसे आले ते ही सहज असं प्रश्न सोनाने विचारला होता. त्यासोबतच ‘जोपर्यंत निर्भयासारख्या घटना आपल्या देशात घडत नाही, तोपर्यंत लोक जागे होणार नाहीत का?' असाही प्रश्न तिने विचारला आहे.

सोनाने विचारलेल्या या प्रश्नाला पाठिंबा देत नेहा भसीन हिने देखील अनू मलिकवर आरोप केला. नेहा तिच्या ट्विटमध्ये लिहिते, "मी तुझ्याशी सहमत आहे. अनू मलिक लैंगिक शोषण करणाराच आहे. अनू मलिकच्या विचित्र वागण्यामुळे मी वयाच्या २१ वर्षी स्टुडिओतून पळ काढला होता. स्टुडिओत सोफ्यावर आडवं पडून माझ्या डोळ्यांविषयी बोलत विचित्र हावभाव करायला लागल्यावर मी खोटं बोलून तिथून कसाबसा पळ काढला. माझी आई स्टुडिओखाली वाट पाहत थांबली आहे असं मी सांगितलं. त्यानंतर त्यानं मला मेसेज, फोन करण्याचेही प्रयत्न केले पण मी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. मी काम मिळेल या आशेने त्यांना माझ्या गाण्याची सीडी द्यायला गेले होते. आमच्या वयातील अंतर लक्षात घेऊन तरी अनू मलिकनं असं वागायला नको होतं."

मुंबई: धक्कादायक! पॉर्न व्हिडिओ पाहून भावानेच केला 6 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार

इतकंच नाही तर 'या इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावयाला अनेक मुली घरापासून, कुटुंबापासून एकट्या इतक्या दूर अनोळखी शहरात येतात. परंतु, अशा घटनांमुळे या नव्या मुलींसाठी ही इंडस्ट्री, हे जग किती असुरक्षित असल्याचे कटू सत्य समोर येते. मुलींचं लैगिंक शोषण करणारे नराधम इंडस्ट्रीच्या आतही आहेत आणि बाहेरही पण आपण या लोकांना माफ का करतो हेच मला समजत नाही' असा सवाल तिने उपस्थित केला आहे.