Kabir Kabeezy Singh Passes Away: कॉमेडियन कबीर 'कबीझी' सिंग (Kabir Kabeezy Singh) यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले आहे. 'अमेरिकाज गॉट टॅलेंट'ची (America's Got Talent) उपांत्य फेरी गाठून कबीरने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. वृत्तानुसार, सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याला प्रकृतीच्या समस्या होत्या असे सांगितले जात आहे.
टीएमझेडच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या कारणाची पुष्टी करण्यासाठी टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट घेण्यात येत आहे. कबीरच्या मृत्यूची बातमी समोर येताच लोकांना मोठा धक्का बसला आहे. कबीरने अल्पावधीतच जगभरात नाव कमावले होते आणि त्यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. (हेही वाचा - Subhash Ghai Health Update: चित्रपट निर्माते सुभाष घई मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल, ICU मध्ये उपचार सुरु)
कोण होता कबीर कबीर सिंग?
कबीर कबजी सिंग हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म पोर्टलँड येथे झाला. त्याचे आई-वडील दोघेही भारतीय आहेत. अमेरिकाज गॉट टॅलेंट शोमुळे कबीर कबजी सिंगची जगभरात ओळख निर्माण झाली. त्याने अतिशय चांगली कामगिरी करत या शोच्या उपांत्य फेरीत धडक मारली. परंतु, अंतिम फेरीपूर्वीच तो शोमधून बाहेर पडला होता. (हेही वाचा - Karan Johar's Mother Admitted To Mumbai Hospital: करण जोहरची आई Hiroo Johar मुंबईतील रुग्णालयात दाखल, मनीष मल्होत्रा यांनी घेतली भेट)
कबीरचा जवळचा मित्र जेरेमी करी याने सोशल मीडियावर पोस्ट करून कबीरच्या मृत्यूची बातमी दिली. झोपेतच कबीर कबजी सिंगचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत. कबीरचे लग्न जमलं होतं. त्याच्या मंगेतरने सांगितले की, तो बर्याच काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होता.