TVS पुढील वर्षात Zeppelin, Apache RTR 310 सह काही धमाकेदार बाइक-स्कूटर करणार लॉन्च
टीव्हीएस स्पोर्ट्स स्पेशल एडिशन (Photo Credit: Twitter)

टीवीएस (TVS) मोटार कंपनीने पुढील वर्षासाठी (2021) साठी खास तयारी केली आहे. त्यानुसार भारतीय ग्राहकांसाठी त्यांच्या बाइकच्या नव्या मॉडेल्स लॉन्च करण्यात येणार असून लोकांमध्ये त्यासाठी अत्यंत उत्साह आहे. टीवीएस प्रत्येक वर्षी ग्राहकांसाठी काही ना काही तरी घेऊन येतात. अशातच आता कंपनी भारतात TVS Zeppelin R, TVS Retron, TVS Creon, TVS Raider, TVS Apache RTR 310, TVS Fiero 125, TVS RTR 160 4V सारख्या दमदार बाइक आणि स्कूटर लॉन्च करणार आहे. ज्या फक्त लूक नव्हे तर स्टाइल आणि फिचर्समध्ये ही अधिक अॅडवास असणार आहे. लोकांना बाइक ते स्पोर्ट्स बाइक यामध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. तर जाणून घ्या टीवीएस कंपनीच्या या नव्या बाइक्स आणि स्कूटर बद्दल अधिक माहिती.

TVS Apache RTR 310 ही कंपनीची धमाकेदार बाइक ऑक्टोंबर-डिसेंबर 2021 दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते. यामध्ये नेकेड स्ट्रिटफायटर सेगमेंट मधील लहान हेडलॅम्प आणि शार्प फ्यूल टँक दिले जातील. त्याचसोबत काही अॅडवान्स फिचर्स ही मिळू शकतात. 300 हून अधिक CC चे टीवीएस आपाचे आरटीआर 310 भारतात 2.3 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.(Honda कंपनी लवकरच भारतात घेऊन येणार नवी SUV, जबरदस्त लूकसह Tata Harrier ला देणार टक्कर)

2021 TVS Apache RTR 160 4V ही बाइक पुढील एक-दोन महिन्यात कंपनी ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे. ही बाइक नुकतीच बांग्लादेशात लॉन्च करण्यात आली आहे. ही बाइक स्मार्ट कनेक्टिव्हिटी लैस आहे. ज्यामध्ये टर्न बाइ टर्न नॅविगेशन, कॉल एसएमएस अलर्टसह काही दमदार फिचर्स मिळणार आहेत. याची किंमत भारतात 1 लाख 10 रुपयांदरम्यान असू शकते.(Datsun च्या 'या' फॅमिली कारवर दिला जातोय 51 हजारांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

टीवीएस कंपनी TVS Zeppelin R पुढील वर्षात Zeppelin R लॉन्च करणार आहे. जी क्रुजर सेगमेंट मधील आहे. याचे डिझाइन अत्यंत वेगळे असणार आहे. यामध्ये Octagonal Instrument Cluster,Rectangular Rear View Mirrors सह फ्युल टँक ही वेगळे असणार आहे. ही भारतात 1.5 लाखांच्या रेंजमध्ये एप्रिल-जून दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते.