भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 5 बाईक

दुचाकी वापरणाऱ्यांचा देश अशी भारताची नवी ओळख जगाला होऊ पाहते आहे. कारण, जगभराच्या तुलनेत दुचाकींची सर्वाधिक विक्री ही भारतात होते. हे जरी खरे असले तरी, तुम्हाला माहिती आहे का, भारतात सर्वाधिक खपल्या जाणाऱ्या दुचाकी कोणत्या. म्हणूनच जाणून घ्या देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या या टॉप 7 बाईक.

हीरो होंडा स्प्लेंडर

97.2 सीसी इतकी इंजीन क्षमता असलेली ही बाईक सर्वाधिक भारतीयांची पहिली पसंती आहे. या गाडीची अतिरिक्त पॉवर 8.24 बीएचपी (8000 आरपीएम )इतकी आहे. आणि ही गाडी प्रति लीटर 70 किलोमिटर इतके अंतर कापत असल्याचा दावा करते.

हीरो एचएफ डीलक्स

हीरो मोटोकॉर्पची ही बाईक देशातील ग्राहकांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती आहे. या गाडीच्या इंजीनची क्षमता 97.2 सीसी इतकी आहे. हिची अतिरिक्त पॉवर 8.24 (8.000आरपीएम ) इतकी आहे. प्रति लीटर 83 किलोमीटर इतके अंतर ही बाईक कापत असल्याचा दावा कंपनी करते.

सीबी शाईन

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ची ही बाईक देशातील ग्राहकांची तिसऱ्या क्रमांकाची पसंती आहे. इंजीन क्षमता 124.7सीसी इतकी असलेल्या या बाईकची अतिरिक्त पॉवर 7500 आरपीएम वर 10.16 बीएचपी इतकी आहे. प्रति लीटर 65 किलोमीटर इतके अंतर ही बाईक कापत असल्याचा कंपनी दावा करते.

हीरो ग्लॅमर

हीरो मोटोकॉर्पची ही बाईक भारतीयांची चौथ्या क्रमांकाची पसंती आहे. इंजीन क्षमता 124.7सीसी इतकी असलेल्या या बाईकची अतिरिक्त क्षमता 7,000 आरपीएमवर 9.00 बीएचपी इतकी आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक प्रति लीटर 60 किलोमीटर इतके अंतर कापते.

रॉयल इनफील्ड क्लासिक 350

दुचाकी खरीदणाऱ्या भारतीय ग्राहकांमध्ये रॉयल इनफील्ड ही बाईक पाचव्या क्रमांकाची पसंती आहे. खरे तर ही काहीशी महागडी आणि प्रचंड लोकप्रिय अशी बाईक आहे. बाईकची इंजीन क्षमता 346.0 सीसी इतकी आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक प्रति लिटर 45 किलोमीटर इतके मायलेज देते.