Maruti Diwali Offers: या दिवाळीत मारुती कारच्या खरेदीवर मिळवा तब्बल 55 हजारांपर्यंत सूट; वाचा सविस्तर
Maruti Suzuki (Photo Credits-Twitter)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतासह अनेक देशांत लॉकडाउन (Lockdown) घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. दरम्यान, आटो मोबाईल क्षेत्रातील कंपनींनादेखील मोठ्या नुकसानीला सामोरे जावा लागले आहे. यामुळे बऱ्याच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच मारुती (Maruti) कंपनीने दिवाळी निमित्त ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल 55 हजारापर्यंत सूट मिळणार आहे.

ऑटो पोर्टल झिगव्हील्समध्ये () अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अरेना आणि नेक्सा मॉडेलवरतब्बल 55 हजारांची सूट देण्यात आली आहे. मारुती अल्टोसह मारुती एस क्रॉस या कारचा यात समावेश आहे. अरेना मॉडेल्सच्या खरेदीवर सूट मिळवण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. तर, नेक्सा मॉडेलवर 20 ऑक्टोबरपर्यंत सूट मिळणार आहे. हे देखील वाचा- Maruti S-cross चे कंपनीने लॉन्च केले लिमिटेड Addition, किंमत 8.56 लाख रुपये

मारुती एस-क्रॉस-

मारुती एस-क्रॉस पेट्रोल कारची किंमत 8.39 लाखांपासून सुरु होते. 12.39 लाखांच्या घरात या कारची किंमत आहे. या कारवर 55 हजारांची सूट मिळणार आहे.

मारुती इग्निस-

मारुती इग्निस कारची सुरुवाती किंमत 4.89 आहे. तर, 7. 19 ही शेवटची किंमत आहे. सेकेंड टू टॉप झेटा मॉडेलवर 10 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट मिळत आहे. तर मारुतीच्या बाकी सर्व मॉडेल कारवर 50 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

मारुती बालेनो- 

मारूती बालेनोची एक्स शोरूम किंमत 5.63 लाखापासून सुरु आहे. 8.96 लाखांपर्यंत किंमत आहे. मारुती बालेनोच्या सर्व व्हॅरिएंट्सवर 33 हजार रुपयांची सवलत मिळत आहे.

मारुती विटारा ब्रेझा- 

मारुती विटारा ब्रेझावर 45 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. या कारची किंमत 7.34 लाखांपासून 11.40 लाखांच्या घरात आहे.

सध्या देशात गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाउनच्या अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या नियमानुसार बऱ्याच गोष्टी पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.