नव्या गाडीला नाव सुचवा आणि जिंका 2 कार्स; आनंद महिंद्रा यांची ट्विटवरुन ऑफर
Anand Mahindra (Photo Credit: Ben Pruchnie/Getty Images)

महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक खास सादर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी या ऑफरबद्दल माहिती दिली. ट्विट करत त्यांनी लिहिले की, "Alturas G4 ची डिलिव्हरी नुकतीच मिळाली. माझ्या या TUV 3 OO plus गाडीला मी ग्रे घोस्ट असे नाव दिले आहे." या ट्विटमध्ये नव्या गाडीची किल्ली मिळाल्याचा फोटोही पोस्ट केला असून या फोटोत मागे नवीकोरी कारही दिसत आहे.

या सुंदर गाडीला नाव सुचवण्याचे आवाहन त्यांनी ट्विटमधून केले आहे. सुचवलेल्या नावांपैकी एक नाव निवडले जाईल आणि त्या व्यक्तीला महिंद्राकडून खास भेट देण्यात येईल. ही भेट म्हणजे महिंद्रा कंपनीच्या 2 नव्याकोऱ्या गाड्या असणार आहे. आनंद महिंद्रांच्या या ट्विटला अनेक प्रतिक्रीया येत असून नावे सुचविण्याचा सिलसिला सुरु आहे.

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर भलतचे अॅक्टीव्ह असतात. तसंच विविध कृतीतून सामाजिक भान जपण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.