
सुपरबाईक बनवणारी कंपनी कावासकी (Kawasaki) मोटर्स इंडियाने भारतात Kawasaki Vulcan S BS6 लॉन्च केली आहे. याची किंमत 5.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कंपनीची जुनी बाईक बीएस6 चे मॉडेल आहे. बीएस4 मॉडेलच्या तुलनेत नवी बाईक 30 हजार रुपयांनी अधिक महागडी आहे. यामध्ये बीएस6 इंजिन व्यतिरिक्त नवे मॅटालिक फ्लॅट रॉ ग्रोस्टोन कलर सुद्धा दिला आहे. खरंतर बाईकचा मॅटालिक ग्रो कलर असून यामध्ये रेड आणि ब्लॅक रंगाचा वापर केलेला दिसून येणार आहे. ही फक्त एकाच रंगात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बाईकच्या स्टायलिंग आणि फिचर्स यापूर्वी सारखेच दिले आहेत. कंपनीने या नव्या बाईकची बुकिंग आधीच सुरु केली आहे.
कंपनीच्या या बाईकमध्ये 649cc चे पॅरलल ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. जे 60BSP ची पॉवर आणि 63Nm चे टॉर्क जनरेट करु शकणार आहे. बाईकचे वजन 235 किग्रॅम असून याच्या फ्यूअल टँकची क्षमता 14 लीटर आहे. मोटारसायकलच्या सीटची उंची 705mm आहे. (Renault Duster टर्बो पेट्रोल मॉडेल भारतात लॉन्च, किंमत 10.49 लाखांपासून सुरु)
.@india_kawasaki has finally launched the BS6 compliant version of the #VulcanS cruiser and compared to the BS4 model, it's Rs. 30,000 more expensive now.https://t.co/5mrEbQKV6n
— carandbike (@carandbike) August 29, 2020
कावासाकी बाईकमध्ये Ergofit सिस्टिम दिली आहे. त्याच्या माध्यमातून राइडर हँडलबार आणि फुटपेग आपल्या हवे तसे अॅडजस्ट करता येणार आहे. या बाईकमध्ये कंपनीने विविध सीट ऑप्शन सुद्धा दिले आहेत. यामध्ये पुढील बाजूस 41mm चे टेलिस्कोपिक सस्पेंशन मिळणार आहे. यामधील दोन्ही टायर्समध्ये डिस्क ब्रेक ही दिले जाणार आहेत.