ब्रिटेनमध्ये होणार काश्मिर महाराजांच्या विंटेज स्पोर्ट कारचा लिलाव
विंटेज स्पोर्ट कार (फोटो सौजन्य - Pixabay)

काश्मिर राजघराण्यातील शेवटचे महाराज हरि सिंह यांच्या जवळ असलेल्या एक दुर्लभ विंटेज स्पोर्ट कारचा लिलाव लंडनमध्ये होणार आहे. तसेच या लिलावात महाराजांची ही विंटेज स्पोर्ट कार त्या लिलावाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

येत्या 2 डिसेंबरला बोनहेम्स बॉन्ड स्ट्रीट सेलमध्ये ही कार लिलावासाठी ठेवली जाणार आहे. तर ब्रिटीशांच्या कार पद्धतींमधील 1924 सालची वॉक्सहॉल 30-90 ओई वेलोक्स अशी या कारची खासीयत आहे. त्यामुळे असे सांगितले जात आहे की, या विंटेज स्पोर्ट कारची किंमत ही सव्वा तीन कोटी ते 70 कोटींच्या घरात या कारचा लिलाव होऊ शकतो. तसेच या कराचे एक स्वत: चे वेगळेपण आहे असल्याचे कार तज्ञ्ज मंडळींचे म्हणणे आहे. तसेच महाराद हरि यांनी या कारमध्ये आपल्या सोईनुसार बदल आणि सुविधा उपलब्ध केल्या होत्या.

महाराज हरि सिंह हे जम्मू काश्मिरमच्या राजघराण्यातील शेवटचे महाराज होते. तसेच राजा अमर सिंह यांचे सर्वांत लहान पुत्र असून त्यांनी डोगरा या शासन पद्धतीचे शेवटचे राजा होते असे सांगितले जात आहे.