Bike Black Smoke (Photo Credits-Facebook)

मोटरसायकल खरेदी केल्यानंतर कालांतराने त्याच्या पार्ट्समध्ये समस्या येण्यास सुरुवात होते. या समस्येकडे जर तुम्ही वेळेवरच लक्ष न दिल्यास तुमचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा बाइकच्या पार्ट्समध्ये काही समस्या येत असल्यास त्यावर वेळेवर उपाय करा. असे केल्यास दीर्घकाळापर्यंत तुम्ही बाइक चालवू शकता. तर जाणून घ्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुमच्या बाइकमध्ये येतात आणि त्यावर काय नेमके करायला हवे.(भारताच्या सीरिजमध्ये आता होणार वाहनांचे रजिस्ट्रेशन, दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी येणारी समस्या होईल दूर)

जर तुमच्या मोटर सायकलचे इंजिन जोरात आवाज करत असेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर तातडीने त्याची दुरुस्ती करुन घ्या. काही वेळेस इंजिनमध्ये एखादा डॅमेज असल्यास ते आवाज करु लागते. यामुळे मोठे नुकसान होण्यापूर्वी त्यावप तोडगा काढा.

तसेच बाइकच्या एग्जॉस्टच्या माध्यमातून काळ्या रंगाचा धूर निघत असल्यास त्याकडेलक्ष द्या. कारण इंजिनमध्ये काही बिघाड किंवा इंजिन ऑइल खराब झाल्याचे तुम्हाला याच्या माध्यमातून संकेत दिले जातात. त्यामुळे ते बदलणे गरजेचे आहे.

ऐवढेच नव्हे तर तुमची बाइक गरजेपेक्षा अधिक आवाज करत असेल तर हा चिंतेचा विषय ठरु शकतो. मात्र जर तुम्ही एखाद्या मॅकानिकला बाइक दाखवल्यास तो तुम्हाला गाडीचा एखादा सैल झालेला पार्ट ठिक करुन देईल. त्याचसोबत बाइकमध्ये एखादी समस्या येत असेल तर मोटरसायकल अधिक ब्राइब्रेशन करु लागते. अशातच गाडीचा पार्ट डॅमेज होऊ शकतो.(Tesla लवकरच भारतात लाँच होण्याचे संकेत, मुंबई-पुणे महामार्गावर 2 Camouflaged Tesla Model 3 ची घेतली चाचणी)

या व्यतिरिक्त तुमच्या बाइकची बॅटरी वारंवार खराब किंवा डिस्चार्ज होत असल्यास त्याच्या वायरिंमध्ये काही समस्या असू शकते. अशातच तुमच्या मोटरसायकलची वायरिंग तपासून पहा किंवा अशी बॅटरी खरेदी करा जी ब्रँन्डेड आहे.