भारताच्या सीरिजमध्ये आता होणार वाहनांचे रजिस्ट्रेशन, दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी येणारी समस्या होईल दूर
| (Photo Credits: PTI)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नव्या वाहनांसाठी भारत सीरिज (Bharat Series) ची घोषणा केली आहे. या नियमानुसार नव्या वाहनांना BH च्या सीरिजमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या सीरिजचा सर्वाधिक फायदा अशा व्यक्तींना होणार आहे जे एका राज्यातून दूसऱ्या राज्यात जात असतात. Bharat Series अंतर्गत रजिस्ट्रेशन क्रमांक घेतल्यानंतर दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी तेथील रजिस्ट्रेशन क्रमांक घ्यावा लागणार नाही आहे. त्यामुळे जरी तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्यास तुम्हाला तुमच्या वाहनाचे नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही आहे. तर जाणून घ्या भारत सीरिज बद्दल अधिक माहिती.

भारत सीरिजमुळे केंद्र सरकारचे कर्मचारी, आर्मी आणि जे लोक कामानिमित्त वारंवार दुसऱ्या राज्यात येत जात असतात. ही सीरिज लागू झाल्यानंतर लोकांना वारंवार आपले वाहन रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही आहे. त्यामुळे जुन्याच रजिस्ट्रेशन क्रमाकाने तुम्हाला प्रवासाची मुभा दिली जाणार आहे.(23 सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार नवी Volkswagen Taigun, जाणून घ्या खासियत)

Tweet:

BH रजिस्ट्रेशनचा फॉर्मेट हा YY BH 5529 XX YY ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये पहिल्या रजिस्ट्रेशनचे वर्ष BH भारत सीरिज कोड 4 – 0000 से 9999 XX (A-Z) पर्यंत असणार आहे.

बीएच सीरिज अंतर्गत मोटार व्हिकल टॅक्स दोन वर्ष किंवा 4,6,8 वर्षाच्या नुसार लावला जाणार आहे. ही योजना नव्या राज्यात स्थलांतरित होणाऱ्या खासगी वाहनांना सुलभ सुविधा देणार आहे. 14 वर्षानंतर मोटर व्हिकल टॅक्स वार्षिक रुपात लावला जाणार आहे. हा टॅक्स वाहनासाच्या किंमतीवर आधारित असणार आहे.