23 सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार नवी Volkswagen Taigun, जाणून घ्या खासियत
Volkswagen Taigun (Photo Credits-Twitter)

यंदाच्या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतिक्षित कारपैकी एक असलेल्या Volkswagen Taigun आता लवकरच लॉन्च केली जाणार आहे. त्यानुसार येत्या 23 सप्टेंबरला ही कार लॉन्च केली जाईल असे कंपनीने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. या कारसाठी बुकिंग मात्र सुरु करण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन कारची बुकिंग ग्राहकांना करता येणार आहे. तर जाणून घ्या कारच्या फिचर्सबद्दल अधिक माहिती.(Kia Seltos X Line: किआ कंपनीची लवकरच एक दमदार कार बाजारात होणार दाखल, जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये)

Volkswagen Taigun कार दोन इंजिन ऑप्शनमध्ये येणार आहे. यामध्ये एक म्हणजे 1.0 लीटर थ्री सिलिंडर पेट्रोल इंजिन आणि दुसरे म्हणजे 4 सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिनसह येणार आहे, या दोन्ही कार क्रमश: 115bhp पॉवर आणि 150bhp जनरेट करणार आहे. त्याचसोबत इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ऑप्शनमध्ये मिळणार आहे.

या कारचे कॉन्सेप्ट मॉडेल गेल्या वर्षात ऑटो एक्सपो 2020 मध्ये दिसून आले होते. त्याचवेळी लोकांच्या ती पसंद पडली होती. आता अशी बाब समोर येत आहे की, 18 ऑगस्ट पासून त्याचे प्रोडक्शन सुरु करण्यात आले आहे. तर पुढील महिन्यात भारतातील रस्त्यांवर ती धावताना दिसून येईल. फॉक्सवॅगन टाइगुनसाठी लोगो आणि स्वदेशी MQB A0 IN प्लॅटफॉर्मसह भारतात लॉन्च केली जाणार आहे. Volkswagen Group च्या INIDA 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत ही कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. या वर्षाच्या प्लॅटफॉर्मवर Skoda Kushaq SUV लॉन्च केली होती.

कारच्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, वायरलेस चार्जिंग पॅड, एसयुबी टाइप सी पोर्ट, ऑटोमॅटिक क्लाइमेंट कंट्रोल, सनरुफ,इंजिन पुश स्टार्ट बटण, मल्टीपल एअरबॅग्स, वेंटिलेटेड फ्रंट सीट, आइसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स, डुअल लेन्स प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED DRL, डुअल स्लेट क्रोम ग्रिल, डुअल टोन अलॉय व्हिल्ज, शार्क फीन एंटिनासह काही खासियत कारमध्ये मिळणार आहे.