जर्मनीची कार निर्माती कंपनी फॉक्सवॅगन यांनी त्यांची दमदार एसयुवी टिगुआन मधले सर्वाधिक पॉवरफुल वेरियंट 2021 Volkswagen Tiguan R कारचे मॉडेल झळवकले आहे. या कारसाठी 315bhp ची पॉवर इंजिन दिले आहे. त्याचसोबत ही कार 4.9 सेकंदात 100 किमी प्रति तास वेगाने धावणार आहे. पॉवरफुल अशी स्पोर्ट कारची मॅक्सिमम स्पीड 250kmph आहे. फॉक्सवॅगन कंपनीने असा दावा केला आहे की, Volkswagen Tiguan R परफॉर्मेन्समध्ये स्पोर्ट्स कार आणि पॉवरमध्ये एसयुवी सारखी आहे. ज्यामुळे तिचे लूक आणि पॉवरमुळे स्पीडच्या बद्दल अधिक जबरदस्त आहे.

2021 Volkswagen Tiguan R ची किंमत 56,703 युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार 50.05 लाख रुपये आहे. सध्या भारतात Volkswagen Tiguan ची विक्री केली जात आहे. ज्याची किंमत 28 लाख रुपये आहे. या धासू प्रीमियम एयसुवीची टक्कर मर्सिडीज, बीएमडब्लू आणि ऑडीसह अन्य प्रीमियम कंपन्यांसोबत होणार आहे. जी 50 लाखांच्या रेंजमधील आहे.(Nissan Magnite भारतात येत्या 2 डिसेंबरला होणार लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

कारच्या इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास ही एक एसयुवी असून त्यामध्ये EA888 evo4 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन लेस आहे. जी 315bhp ची पॉवर आणि 420Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. फॉक्सवॅगनच्या या कारध्ये पहिल्यांदाच मल्टीपल क्लचेजचे ऑप्शन दिले आहे. या कारमध्ये बंपरचा R शेप अत्यंत आकर्षक दिसतो. ज्यामध्ये हाय-ग्लॉस ब्लॅक एक्रोडायनामिक एलिमेंट्स दिले गेले आहेत. तसेच 21 इंचाचे Estoril alloy wheels दिले गेले असून ब्रेक सिस्टिम 18 इंचाचे आहे.(Mahindra Thar कंपनीने बंद केल्या दोन एन्ट्री लेव्हल वेरियंट, जाणून घ्या याची सुरुवाती किंमत)

Volkswagen Tiguan R च्या डिझाइन आणि फिचर्स मध्ये या एसयुवी मध्ये एक्सटीरियर ब्लॅक स्टाइल डिझाइन पॅकेज मध्ये लेस आहे. या कारमध्ये 8 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिला गेला आहे. जो अत्यंत लेटेस्ट वर्जन आहे. या मध्ये क्लायमेट कंट्रोल फंक्शन, वॉईस कंट्रोल, ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिम आणि अॅडेप्टिव्ह क्रुज कंट्रोलसह अन्य काही फिचर्स मिळणार आहेत.