महिंद्रा अॅन्ड महिंद्रा ने नवी थार एसयुवी भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या दमदार एसयुवीची सुरुवाती किंमत 9.80 लाख रुपये ठेवली आहे. या कारचे कंपनीने बेस वेरियंट AX Std, AX पेट्रोल वेरियंट बंद केले आहे. म्हणजेच बेस वेरियंट हटवण्यासह आता नवी महिंद्रा थारची सुरुवाती किंमत 11.90 लाख रुपये झाली आहे.(Mahindra XUV500 Car: कमी पैशात चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 'महिंद्रा एक्सयूव्ही 500' ठरू शकते बेस्ट ऑपशन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)
कंपनीने जे वेरियंट हटवले आहे त्याच्या बेसिक स्टिल व्हिल्स, साइड-फेसिंग फोर सीटर ऑन्फिगरनेशन, मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सॉफ्ट टॉप रुफसह उपलब्ध होते. या एसयुवीचा एन्ट्री लेव्हल ट्रिम आता एक्स (ओ) आहे. वेबसाइट वेरियंट हटवण्यासंदर्भात कंपनीकडून कोणत्याही पद्धतीची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र आशी अपेक्षा आहे की थारसाठी सातत्याने मिळणाऱ्या बुकिंगच्या कारणास्तव बेस वेरियंट लाइनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या महिंद्रा थार मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. जो 150bhp ची पॉवर आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. त्याचसोबत यामध्ये एक 2.2 लीटर mHawk डिजिटल युनिट ही दिले आहे. जो 130bhp ची पॉवर आणि 300Nm चे पीक टॉर्क जनरेट करणार आहे. कंपनीने या दोन्ही इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स लैस केले आहे.(महिंद्रा कंपनीची Bolero मॉडेल महागली, जाणून घ्या नवी किंमत)
या कारमध्ये एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाईट्स, स्टायलिश अलॉय व्हिल, 7 इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेन्मेंट सिस्टिम, सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रुज कंट्रोल, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोलचा समावेश आहे. नव्या महिंद्रा थार ने भारतीय बाजारात जवळजवळ 1 महिन्यात 29 हजारांहून अधिक बुकिंग केल्या आहेत. ज्याचा वेटिंग पिरेड 7 महिन्यांवर पोहचला आहे.