Nissan Magnite (Photo Credits- Twitter)

Nissan Magnite कार येत्या 2 डिसेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. याबद्दल कंपनीकडून अधिक माहिती दिली गेली आहे. Magnite एक सब कॉम्पॅक्ट एसयुवी असून कंपनी कमी किंमतीत आणि उत्तम फिचर्ससह मार्केट मध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही ही एसयुवी करेदी करण्याच्या विचार करत असल्यास लॉन्चिंग पूर्वी याच्या किंमतीसह खासियत बद्दल सांगणार आहोत.प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही कॉम्पॅक्ट एसयुवी 4 ट्रिम मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ज्यामध्ये XE,XL,XV आणि XV प्रीमियमसह एकूण 8 वेरियंटमध्ये असणार आहे. निसान मॅग्नाइटची किंमत 5.50 लाख रुपये ते 8.15 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.(Tata Motors च्या वाहन खरेदीवर 5 लाखांचे बक्षिस जिंकण्याची संधी, कंपनीने सुरु केली बंपर ऑफर)

इंजिन आणि पॉवर बद्दल सांगायचे झाल्यास ही एसयुवी एन्ट्री लेव्हल वेरियंट मध्ये नॅचरली एस्पिरेटेड 1.0 लीटर पेट्रोल इंजिनसह येऊ शकते. जी 71बीएचपी ची पॉवर आणि 96 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच कार मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह उतरवली जाऊ शकते. या व्यतिरिक्त कंपनी यामध्ये 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन सुद्धा देऊ शकते. जो टॉप अॅन्ड वेरियंटमध्ये मिळू शकतो.(Nissan Magnite च्या भारतातील लॉन्चिंग बद्दल खुलासा, 5.50 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता- रिपोर्ट)

कारमधील फिचर्ससाठी 7 इंचाचा टीएफटी इंस्ट्रुमेंट क्लस्टर, 8 इंचाचा टचस्क्रिन सिस्टिम, 6 स्पीकर, सेगमेंट मध्ये प्रथमच अराउंड व्यू मॉनिटर, ईको फंक्शन ड्रायव्हिंग, टायर मॉनिटरिंग सिस्टिम, वेलकम अॅनीमेशन, मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हिल, डुअल एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशनसह अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम यांचा समावेश असणार आहे.