Tata Gravitas ला टक्कर देण्यासाठी लॉन्च होणार Hyundai Creta, जाणून घ्या खासियत
ह्युंडाई क्रेटा (Photo Credits- Twitter)

दक्षिण कोरियाची वाहन निर्माती कंपनी ह्युंडाई (Hyundai) 16 मार्चला क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहेत. या नव्या कारमध्ये अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा असून मोठे बदल सुद्धा पहायला मिळणार आहेत. क्रेटा फेसलिफ्ट मॉडलिंगच्या लॉन्चिंगची चर्चा जोरदार सुरु झाली असून या दरम्यान 7 सीटर वर्जनचा सुद्धा बोलले जात आहे. भारतात सध्या काही अपकमिंग 7 सीटर मिड साइज SUV's Tata Gravitas, Tata Harrier, Hector Plus आणि Kia Seltos याबबात बोलले जात आहे. त्यामुळे आता ह्युंडाईची क्रेटा 7 सीटर वर्जन लॉन्च करण्याची शक्यता आहे.

ब्रिटिश वाहन कंपनी एमजी मोटर्सची SUB Hector ची 6 सीटर वर्जनला क्रेटाची 7 सीटर कार टक्कर देणारी ठरणार आहे. टाटा मोटर्सकडून हॅरियरच्या 7 सीटर वर्जनवर अधिक काम केले जात आहे. जी ग्रेविटास नावाने लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर महिंद्रा सुद्धा लवकरच 7 सीचर XUV500 लॉन्च करु शकते. कंपनीने 2020 Hyundai Creta ची बुकिंग सुरु केली आहे. लॉन्चिंगपूर्वीच या कारसाठी 10 हजार पेक्षा अधिक जणांनी त्याचे बुकिंग केले आहे.(चीनने बनवली सर्वात जास्त ड्रायव्हिंग रेंज देणारी इलेक्ट्रिक कार; P7 ला एकदा चार्ज केल्यावर धावणार 700 km, Tesla Model 3 ला देणार टक्कर) 

फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास 7 सीटरमध्ये सुद्धा सीटर-5 सारखेच सर्व अपमार्केट फिचर्स देण्यात येणार आहेत. ह्युंडाई क्रेटाच्या 7 सीटरमध्ये पॅनारॉमिक सन-रुफ, टच स्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टिम, क्रुज कंट्रोल, मल्टीपल एअरबॅग सारखे ऑप्शन दिले जाणार आहेत. 7 सीटरची क्रेटा ही 5 सीटरपेक्षा जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयांनी अधिक किंमतीची असणार आहे. कंपनी भारतात क्रेटाची सेकेन्ड जनरेशन वर्जन लवकरच लॉन्च करणार आहे. त्याची किंमत 10 ते 15 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.