कारवरील Dent काढण्यासाठी 'या' सोप्प्या ट्रिक्स बद्दल अधिक जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

जर तुम्ही कार खरेदी केली असेल आणि कधी त्यावर डेंट (Dent) आला असेल तर ही सामान्य गोष्ट आहे.  कारण कारच्या बॉडीवर एखादे वाहन आदळले तर त्यावर डेंट येणे सहाजिकच आहे. कारवर आलेला डेंट हा तुमच्या कारचा लूक खराब करु शकतो. त्यासाठी तुम्ही मॅकॅनिककडे जाऊन डेंट काढण्यासाठी जाता. या गोष्टीसाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च सुद्धा करावा लागतो. पण जर तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय घरच्या घरी डेंट कसा काढतात हे माहिती आहे का?

अगदी सोप्प्या पद्धतीने आणि घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या कारचा डेंट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला हजारो रुपये सुद्धा खर्च करावे लागणार नाही आहेत. तर जाणून घ्या कारवरील Dent काढण्यासाठी 'या' सोप्प्या ट्रिक्स.(भारतात सुरु झाली सर्वात स्वत इलेक्ट्रिक कारची बुकिंग, सिंगल चार्जमध्ये धावणार 200km)

-गरम पाणी

गरम पाणी हे कोणताही धातू पसरवण्याचे काम करतो. त्यामुळे जर तुम्ही गरम पाणी थेट मेटल प्लेटवर टाकलात तर त्याची लांबी आणि रुंदी थोडी वाढू शकते. ही पद्धत तुमच्या कारचा डेंट काढण्यासाठी उपयोगी ठरु शकते. तसेच एखादा मोठा डेंट कारवर असेल तर एका मोठ्या भांड्यात 1 ते 2 लीटर पाणी गरम करुन ते डेंटवर टाका. त्यानंतर थोडा दबाव टाकल्याने कारची बॉडी आधीसारखी होण्यास मदत होईल. पण लक्षात ठेवा पाणी अधिक गरम नसले पाहिजे.

-ग्लू स्टिक

ग्लू स्टिक गरम करुन डेंट ठिक केला जाऊ शकतो. पण यासाठी तुम्हाला खुप ग्लू स्टिक घेऊन त्या डेंट असलेल्या ठिकाणी ठेवाव्या लागणार आहेत. एकदा का या स्टिक चिटकल्या जातील त्यानंतर त्या पाठच्या बाजूने बाहेर खेचून काढू शकता. यामुळे तुमच्या कारवर आलेला डेंट नीट होऊ शकतो.

-मास्किंग टेप

मास्किंग टेप ही अत्यंत मजबूत असते. त्यामुळे याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज डेंट काढू शकता. फक्त डेंटवर खुप मास्किंग टेप लावून नंतर त्या खेचाव्या लागणार आहेत.(FASTag आता बंधनकारक! कुठे मिळणार फास्ट टॅग, आवश्यक कागदपत्रं कोणती?)

तर वरील काही सोप्प्या आणि कमी खर्चात तुम्ही तुमच्या कारवरील डेंट काढू शकता. पण अगदीच डेंट निघत नसेल तर या गोष्टी करण्यापूर्वी एका मॅकॅनिकलला सुद्धा दाखवा.