भारतात सुरु झाली सर्वात स्वत इलेक्ट्रिक कारची बुकिंग, सिंगल चार्जमध्ये धावणार 200km
Strom R3 Electric Car (Photo Credits-Twitter)

Storm R3 Electric Car: देशात इलेक्ट्रिक कारचा वापर अधिकाधिक वाढवण्यासाठी त्यात आणखी एका कंपनीची कार त्यात सहभागी झाली आहे. त्यानुसार स्ट्रोम मोटर्स यांनी त्यांची सर्वात लहान आणि स्वस्त अशी ओळख असणाऱ्या Strom R3 साठी बुकिंग सुरु केले आहे. कंपनीने 2018 मध्ये स्ट्रोम आर3  एन्ट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार झळकवली होती. त्यामुळे ज्यांना ही कार खरेदी करायची आहे त्यांना 10 हजार रुपये देऊन ती बुकिंग करता येणार आहे. परंतु बुकिंग पूर्वी आम्ही तुम्हाला कारच्या काही फिचर्ससह महत्वाच्या गोष्टींबद्दल सुद्धा अधिक माहिती देणार आहोत.

स्ट्रोम आर3 ही तीन चाकी गाडी आहे. यामध्ये दोन्ही बाजूला दरवाजे दिले गेले आहेत. ही इलेक्ट्रिक कार मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु सारख्या शहरांसाठी डिझाइन केली गेली आहे. कारचा फ्रंट हा निमुळता आहे. तसेच सनरुफसह कारच्या पुढील बाजूस बंम्पर, एलईडी लाइट्स, रियर स्पॉइलर मिळणार आहे. लहान इलेक्ट्रिक कारची लांबी 2907 मिमी, रुंदी 1405 मिमी आणि उंची 1572 मिमी आहे. यामध्ये 185 मिमीचा ग्राउंड क्लिअरेंस असून या ईवीचे एकूण वजन 550 किमी आहे.

स्ट्रोम आर3 इलेक्ट्रिक कारमध्ये टू सिंटिंग कॉन्फरिग्रेशन मिळणार आहे. ज्यामध्ये पुढील बाजूस दोन जण किंवा 3 जण बसू शकतात. याच्या कॉम्पॅक्ट ईवी मध्ये 12 वे अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, 4.3 इंचाचा डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल, क्लायमेट कंट्रोल, रिमोट किलेस एन्ट्री असे फिचर्स दिले गेले आहेत. तर IOT-Enabled कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टिम आणि 4जी कनेक्टिव्हिटी, वॉइस कंट्रोल, जेस्चर कंट्रोल, 20 जीबी ऑनबोर्ड म्युझिक स्टोरेज आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह 7 इंचाचा टचस्क्रिन इंम्फोटेनमेंट सिस्टिम दिला आहे.(TVS Motor कंपनीने आपली लोकप्रिय बाइक Apache RR 310 च्या किंमतीत पुन्हा केली वाढ, जाणून घ्या नवे दर)

कंपनीने या कारमध्ये 20bhp ची पॉवर आणि 90Nm चा टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जाणार आहे. त्याचसोबत यामध्ये 3 ड्रायव्हिंग मोड इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मिळणार आहे. ही लहान इलेक्ट्रिक कार  80kmph पर्यंत टॉप स्पीड देण्यास सक्षम आहे. तर एकदा चार्ज केल्यानंतर ती  200km पर्यंत अंतर कापू शकणार आहे. तसेच कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो.