देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी कंपनी हिरो मोटोकॉर्प ने (Hero Motocorp) तीन नव्या बाईक्स बाजारात सादर केल्या आहेत. दिल्लीच्या एक्स शोरुममध्ये या बाईक्सच्या किंमती 94 हजार रुपयांपासून ते 1.05 लाख रुपयांपर्यंत आहेत. 200 सीसी इंजिन असलेल्या एक्स प्लस 200टी या बाईकची किंमत 94 हजार, एक्स पल्स 200 ची किंमत 97 हजार आणि एक्सट्रीम 200 एसची किंमत 98,500 रुपये इतकी आहे. एक्स पल्सच्या फ्यूएल इंजेक्शन वेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये आहे. बाईक्सची बुकींग लवकरच सुरु होईल आणि काही आठवड्यातच विक्रीला देखील सुरुवात होईल, असा अंदाज आहे.
पहा व्हिडिओ:
तीन नव्या बाईक्स:
XPulse 200 यात बरेच बदल करण्यात आले असून यात उच्च-माउड मुडगार्ड, इंजिन बॅश प्लेट, सॅप्ट अप एक्झोस्ट आणि नॅकल गार्ड आणि बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. 21 इंचाचा स्पीच व्हील अग्रिम आणि मागील 18-इंच स्पीच व्हील तसंच सीट टायर शॉडसह ही बाईक उपलब्ध आहे.
Entering a new era of premium biking. Presenting the next-gen motorcycles for youth around the world. #XPulse200 #XPulse200T #Xtreme200S pic.twitter.com/OSAF6MATik
— Hero MotoCorp (@HeroMotoCorp) May 1, 2019
XPulse 200T यात अॅलोई व्हील, पारंपरिक माउंट एक्झोस्ट, रोड-टायट टायर्स, रिलायर्ड एरगोनॉमिक्स यांसारखे बरेच फिचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही मोटरसायकल ब्ल्यूटूथ, टर्न-बाय-टर्न नेविगेशन, फुल-लीड हेडलंप, एलईडी टेलिलाइट आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह सुसज्ज आहेत.
The #XPulse200T, India’s only 200cc modern Tourer with retro flavor available at Rs. 94,000/- (Ex-showroom, Delhi). pic.twitter.com/gxLIyfXGhb
— Hero MotoCorp (@HeroMotoCorp) May 1, 2019
XPulse 200 ची दोन्ही आवृत्ती एकाच 200cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूलड इंजिनद्वारे चालविली जातात.
The #Xtreme200S is priced at Rs 98,500- (Ex-showroom, Delhi). pic.twitter.com/YMoi7lK9If
— Hero MotoCorp (@HeroMotoCorp) May 1, 2019
मे महिन्याच्या अखेरीस बाइकसाठी डिलिव्हरी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.