Electric Cars to get Green Number Plates (Photo Credits: File Photo)

Green Number Plate For Electric Vehicles: वाढत्या प्रदूषणाला आळा बसवण्याच्या प्रयत्नातून अलीकडे विद्युत वाहनांना (Electric Vehicles) प्रोत्साहन देण्याचे काम सरकार तर्फे करण्यात येत आहे. यासाठी विद्युत वाहनांचा वापर करणाऱ्या मंडळींना काही विशेष सवलती देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मागील वर्षभरापूर्वी या विद्युत वाहनांची ओळख पटण्याकरिता त्यांना खास हिरव्या रंगाची नंबर प्लेट लावण्यात यावी अशी मागणी सरकारने केली होती, याची पूर्तता करत केंद्रिय रस्ते आणि परिवहन (Central Road And Transport Ministry) मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांच्या परिवहन मंडळांना पत्र लिहून निर्देश जारी केले आहेत. तसेच या वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने वाहनधारकांना खरेदीवर सूट, मोफत पार्किंग व टोल भरण्यात अनेक सवलती देण्यात येणार आहेत.

या विशेष नंबर प्लेटवर हिरव्या रंगावर पांढऱ्या रंगात नंबर लिहिण्यात येतील. यंदा फेब्रुवारी महिन्यात 'फेम' (FAME) 'Faster Adoption and Manufacturing of (Hybrid &) Electric Vehicles' योजने अंतर्गत विद्युत वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सवलती देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले होते. या बजेटचा वापर करून विद्युत वाहने बनवणाऱ्या व किमान 50% भारतीय मूळ असणाऱ्या कंपन्यांना देखील सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याच प्रमाणे या वाहनांच्या चार्जिंग साठी देशातील मुख्य शहरांमध्ये साधारण 7200 चार्जिंग बूथ ची बांधणी करणार असल्याचे सांगितले गेले आहे .याची सुरवात करून काल संसदेत विद्युत  वाहनाचे चार्जिंग बूथ लाँच करण्यात आले आहे

इंडिया टाइम्सने सादर केलेल्या वृत्तानुसार येत्या वर्षात देशभरात 1 मिलियन ई-दुचाकी, पाच लाख ई- तीन चाकी वाहने, 55,000 ई- चारचाकी वाहने व 7000 ई-बस पाहायला मिळतील अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. याशिवाय ग्राहकांना बॅंकांतर्फे देखील विद्युत वाहनासाठी घेतलेल्या कर्जावर देखील सवलत मिळणार आहे. टॉप 5 पेट्रोल फ्री कार, भारतात लवकरच लॉन्च; इंधन दरवाढीपासून ग्राहकांची सुटका, पाहा किंमत, कशी आहेत फिचर्स?

 

यासंदर्भात नीती आयोगाने केंद्र सरकारसाठी एक प्रस्ताव तयार केला होता. यात केंद्रातील सात मंत्रालय पॉवर, रोड, हेवी इंडस्ट्रीझ यांची मदत घेतली आहे.