Tata Motors कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! Economic Slowdown असला तरी नोकरी सुरक्षीत
Tata Motors | (Photo Credits: Tatamotors.com)

देशात सुरु असलेला Economic Slowdown विविध क्षेत्रं आपल्या कवेत घेत आहे. अपवाद म्हणूनही एखादे क्षेत्र या कवेतून सुटले नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. तर काही त्या मार्गावर आहेत. अशात देशातील वाहन उत्पादक आणि औद्योगिक क्षेत्रात वजन राखून असलेली अग्रगन्य कंपनी Tata Motors आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देऊ पाहात आहे. Tata Motors ने नुकतेच जाहीर केले आहे की, देशात आर्थिक मंदी सदृश्य वातावरण आहे. हे वातावरण इतक्यात निवळण्याची कोणतेही चिन्हे नाहीत. मात्र, असे असले तरी टाटा मोटर्स कोणत्याही प्रकारे कर्मचारी कपात करणार नाही.

दरम्यान, टाटा मोटर्स कर्मचारी कपान न करता भविष्यातील योजना आखत आहे. Tata Motors ऑटोमोबाइल विंग ने दिलेल्या संकेतानुसार, कंपनी लवकरच नव्या महिन्यात काही नवी उत्पादने सुरु करत आहे. या उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करण्यावर सध्या कंपनीचा भर आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगतले की, सध्या अर्थव्यवस्थेवर मंदीसदृश्य वातावरण आहे. त्यामुळे अनेक कांपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. परंतू, टाटा मोटर्स प्रशासानाचा तसा कोणताच विचार नाही. टाटा मोटर्स कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्या माहितीनुसार टाटा कंपनीत सुमारे 83,000 लोक कार्यरत आहेत.

Tata Motors चे चीफ एक्जीक्यूटिव ऑफिसर आणि मैनेजिंग डायरेक्टर Guenter Butschek यांन वृत्तसंस्था पीटीआय ला दिलेल्या माहितनुसार, कर्मचारी कपातीचा कोणताही विचार टाटा मोटर्स करत नाही. कंपनीचा जर असा काही विचार असतातच तर आतापर्यंत तो अंमलातही आला असता. Butschek यांनी पुढे सांगितले की, आम्ही गेले 12 महिने म्हणजेच एक वर्षभर संकटात आहोत. परंतू, तरीही कर्मचारी कपातीसंदर्भात आमचा कोणताही विचरा नाही. आम्हाला तसे पाऊल उचलायचे असते तर आम्ही ते केव्हाच उचलले असते, असेही Butschek यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Tata कंपनीच्या येणाऱ्या नव्या कारचा Teaser झळकला, 7-सीटरसह होणार लॉन्च)

Butschek यांन पुढे बोलताना सांगितले की, येत्या काही काळात कंपनी Altroz, Nexon EV आणि Gravitas SUV यांच्यासह इतरही काही नवी उत्पादने बाजारात घेऊन येत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आर्थिक स्थिती प्रतिकूल असतानाही कंपनीक चांगल्या स्थानी आहे. त्यामुळे येणारा काळ कंपनीसाठी प्रचंड सकारात्मक असेल. दरम्यान, येत्या 30 वर्षात कंपनीने इतकी वाईट आर्थिक स्थिती पाहिली नसल्याचे निरीक्षणही या अधिकाऱ्याने नोंदवले.