Tata कंपनीच्या येणाऱ्या नव्या कारचा Teaser झळकला, 7-सीटरसह होणार लॉन्च
Tata कंपनीच्या येणाऱ्या नव्या कारचा Teaser झळकला, 7-सीटरसह होणार लॉन्च (Photo Credits-Twitter)

Tata Moters ने Tata 45X कॉनेप्सटची पुष्टी केल्यानंतर आता SUV चा एक नवीन व्हिडिओ प्रदर्शित केसा आहे. या मॉडेलच्या SUV, OMEGARC प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कारचा निम्मा हिस्सा Silhoutte दिसून येत आहे. असे सांगितले जात आहे की, Tata Harrier ही कार 7-सीटर असणार आहे. तसेच या कारचे नाव पूर्णपणे वेगळे ठेवण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार टाटा मोटर्स ही कार येत्या वर्षाअखेरीस लॉन्च करणार आहेत.

टीझरमधून असे दिसून येते की,यामध्ये रेल्स रुफ आणि फ्लोरबोर्ड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Tata H7X मध्ये 18 इंच अलॉय व्हिल्स देण्यात येणार आहेत. तसेच कारच्या या नव्या मॉडेलमध्ये वेगळेपण दिसून येणार आहे. 2.0 लीटर Kryotec इंजिन असण्याची शक्यता आहे. जे 170bhp ची कमीतकमी पॉवर निर्माण करु शकणार आहे. या कारची किंमत जवळजवळ 15 लाख रुपये असणार आहे.

Tata H7X भारतीय बाजारात Mahindra XUV500 आणि Toyota Innova Crysta या दोन कारच्या मॉडेलला टक्कर देऊ शकते.त्याचसोबत टाटा कंपनी लवकरच Altroz मॉडेल लॉन्च करणार आहे. या Altroz, 45X इलेक्ट्रिकल हॅचबॅक सह हे मॉडेल Micro-SUV असू शकणार आहे.