भारतात मोटरसायकल कंपनीचे मोठे मार्केट आहे. त्यामुळे येथे प्रत्येक मॉडेलमधील बाईक ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध आहेत. नुकतेच बीएमडब्लू (BMW) कंपनीने त्यांच्या दोन नव्या बाईक लाँन्च केल्या आहेत. ज्यांची किंमत 16.85 लाख ते 21.95 लाख रुपयापर्यंत आहे. तसेच या बाईकच्या किंमतीच्या तुलनेत अधिक लूकने चांगल्या दिसणाऱ्या बाईक यांची किंमत 85 लाख रुपयांपर्यंत आहे. तर पाहूयात कोणत्या आहेत 'या' बाईक.
-Harley-Davidson CVO
हार्ली डेविसन ही एक सर्वात भारतातील महागड्या बाईकपैकी आहे. यामध्ये 192cc इंजिन देण्यात आले आहे. तर या बाईकची किंमत 50.51 रुपये एवढी आहे.
-Ducati Panigale 1299 FE
भारतातील सर्वात महाग आणि चौथ्या क्रमांकावरील दमदार स्पोर्ट बाईक म्हणून Ducati Panigale 1299 FE ओळखली जाते. या बाईकमध्ये 1285cc इंजिन देण्यात आले असून 209.4 hp पावर देण्यात आली आहे.तसेच 142 Nm टॉर्क जनरेटर आहे. बाईकची किंमत 51.58 लाख रुपे आहे.
-Ducati Panigale V4 R
या बाईकला 998cc इंजिन देण्यात आले आहे. 221hp पावर आणि 111Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स पेक्षा कमी देण्यात आले आहे. भारतातील टॉप 5 महागड्या बाईक मधील तिसऱ्या क्रमाकांवरील ही दुकाटीची बाईक आहे. या बाईकची किंमत 51.87 लाख रुपये आहे.
-2019 Kawasaki Ninja H2R
कावासकी निंजा ही एक दमदार बाईक भारतात सर्वात जास्त प्रमाणात विकली जाते. यामध्ये 998cc सुपरचार्ज इंजिन देण्यात आले आहे. तसेच 326hp पावर आणि 165Nm टॉर्क जनरेट करु शकते. या दमदार बाईकची किंमत 72 लाख रुपये एवढी आहे.