तरुणाईचे आकर्षण Bajaj Pulsar NS 125 लॉन्च, कशी आहेत फिचर्स
(प्रातिनिधिक प्रतिमा Photo Credits Twitter bajajauto)

भारतीय मोटारसायकल बाजारात लोकप्रिय असलेली Bajaj Pulsar (बजाज पल्सर)ची Bajaj Pulsar NS 125 लॉन्च झाली आहे. गेले बराच काळ या बाईकच्या लॉन्च होण्याबाब उत्सुकता होती. अखेर, उत्सुकतेचा पडदा हटवत बजाजने ही नवी कोरी बाईक बाजारात उतरवली. बजाजने ही बाईक पोलंडमध्ये लॉन्च केली आहे. पोलंडच्या चलनानुसार कंपनीने या बाईकची किंमत 7,999 Polish złoty इतकी ठेवली आहे. भारतीय रुपयांत ही किंमत सांगायची तर सुमरे 1.59 लाख रुपये इतकी आहे. 125cc Pulsarमध्ये फ्यूल इंजेक्शन आणि सीबीएस देण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, 125 सीसी पल्सर भारतात Pulsar 135 LS रिप्लेस करेन. गाडीच्या स्टायलिंगबाबत बोलायचे तर, नवी पल्सर 145 प्रमाणेच दिसते. दरम्यान, पल्सर एनएस 125 मध्ये डबल सीट सेट-अप देण्यात आला आहे. नवी बाईक इतर मॉडेल्सप्रमाणे बॅली पॅनसुद्धा आहे. एनएस 125मध्ये पल्सर एनएस 160 आणि एनएस 200 सारखा मॅट कलर स्कीम पहायला मिळेल.

गाडीच्या पॉवरबाबत बोलायचे तर, 125 वाल्या नवी पल्सरमध्ये सिंगल-सिलिंडर, 4-वॉल्व, फ्यूल इंजेक्टेड, एअर-कूल्ड, DTS-i 124.4cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,500rpm वर 12hp ची पॉवर आणि 6,000rpm वर 11Nm टॉर्क जनरेट करते. सस्पेंन्शनसाठी टेलिस्कोपिक फॉर्क आणि मोनोशॉक आहे. त्याच्या पुढच्या बाजूला 240mm डिस्क आणि रियर मध्ये 130mm ड्रम ब्रेक दिला आहे. बाईकमध्ये सीबीएस स्टँडर्ड आहे. ज्याचे वजन 126.5 किलोग्रॅम आणि ग्राऊंड क्लियरन्स 170mm आहे. पोलिश बजाज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, नव्या 125 सीसी पल्सरचा व्हिलबेस 1,325mm इतका आहे.

दरम्यान, ही बाईक भारतातही लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. भारतात या बाईकची किंमत पल्सर 135एलएसपेक्षा काहीशी अधिक असू शकते. पल्सर 135 एलएसची मुंबईतील एका शोरुममध्ये असलेली किंमत 62,528 रुपये इतकी आहे. मार्केटमध्ये ही बाईक Honda CB Shine SP आणि Hero Glamour 125या बाईकला टफ देईन.