Bajaj Pulsar 150 Twin Discची नवी छबी लवकरच ग्राहकांच्या भेटीला
Bajaj Pulsar 150 Twin Disc1 (Archived, representative image)

भारतीय बाजारपेठेत भलतीच लोकप्रिय असलेली बाईक कंपनी Bajaj आपल्या Pulsar 150 Twin Discला लवकरच न्यू लुकमध्ये सादर करत आहे. ज्यात Pulsar 150 Clasic Black पासून Pulsar RS200 पर्यंतच्या बाईकचा समावेश असणार आहे. कंपनी Pulsar 150 Twin Disc ला नव्या स्टाईलमध्ये सादर करणार आहे. नवी पल्सर १५० ट्विन डिस्क बजाजच्या काही डिलरपर्यंत पोहोचलीही आहे. तसेच, या बाईकचे काही फोटो लिकही झाले असल्याचे सांगितले जात आहे. नवी पल्सर आगोदरच्या तुलनेत १,५०० रुपयांनी महाग असल्याचे समजते.

खरेतर पल्सर १५० ट्विन डिस्कमध्ये तांत्रिकदृष्ट्या (मॅकेनेकली) काही विशेष बदल करण्यात आले नाहीत. Pulsar 150 Twin Disc मध्ये 149cc, सिंगिल सिलिंडर, टविन स्पार्कवालेच इंजिन आहे. जे 8,000rpm वर 14hp ची पॉवर आणि 6,000rpm वर 13.4Nm टॉर्क जनरेट करते. यात 5स्पीड गियरबॉक्स आहेत. बाईकच्या नावावरुनच अंदाज येतो की, यात फ्रंड आणि रिय अशा दोन्ही बाजूला डिस्क देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, जगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स)

बजाजची ट्विन डिस्क पल्सरची मार्केटमध्ये होंडा सीबी यूनिकॉरन 16, टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 आणि हीरो एक्सट्रीम स्पोर्ट यांसारख्या बाईकसोबत स्पर्धा असणार आहे. दरम्यान, पर्सर 150 क्लासिकचे अपडेटेड व्हर्जनचे फोटोही नुकतीच प्रसिद्ध झाली होती.