Aprilia SXR 125 भारतात लवकरच होणार लॉन्च, फक्त 5 हजार रुपयांत करता येणार बुकिंग
Aprilia SXR 125 (Photo Credits-Twitter)

इटलीची वाहन निर्माती कंपनी Aprilia SXR 125 स्कूटर अधिकृतरित्या बुकिंग करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 5 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. संपूर्ण भारतात ई-कॉमर्स साइट किंवा कोणत्याही Aprilia च्या डिलरशीपच्या माध्यमातून ही स्कूटर प्री-बुकिंग करता येणार आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, SXR 125 स्टाइल आणि ड्रायव्हिंग एक परफेक्ट कॉम्बिनेशन असून जे आरामदायी प्रवासाचा एक शानदार अनुभव देणार आहे. तर भारतीय बाजारासाठी ही इटलीमध्ये तयार करण्यात आलेली ही पहिलीच स्कूटर आहे.

नवी अप्रिलिया एसएक्सआर 125 च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात लॉन्च झालेल्या Aprilia SXr 160 प्रमाणेच आहे. स्टायलिंग बिट्स सारखे एक लांब वाइजर एक विस्तृत फ्रंट अॅप्रन आणि लांब सीट पॅनल हे तुम्हाला अप्रिलिया एसएक्सआर 160 मध्ये सुद्धा दिसून येणार आहे. ही स्कूटर कंपनीने आपल्या नव्या ग्लोबल डिझाइन लॅग्वेजच्या आधारावर तयार केली आहे. यामध्ये डे टाइमिंग रनिंग लॅम्प आणि टेललॅम्प डिझाइनसह एलईडी हेडलॅम्पच्या आजूबाजूचा हिस्सा RS660 पासून प्रेरित असल्याचे दिसून येईल.(ट्रायम्फने भारतात लॉन्च केली Bonneville ची नवी रेंज, किंमतीसह फिचर्मध्ये करण्यात आले बदल)

स्कूटरच्या इंजिनसाठी कंपनीने यामध्ये 125cc, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. जे SR125 मध्ये सुद्धा पहायला मिळणार आहे. हा BS6- कंप्लाइंट, थ्री-वॉल्व फ्यूल इंजेक्टेड मोटर आहे. जो 9.4bhp ची पॉवर आणि 8.2Nm चे टॉर्क जनरेट करम्यास ट्यून केले गेले आहे. स्कूटर 12 इंच, 5 स्पोक अलॉय व्हिल्ससह असेंबल केली जाणार आहे. यामध्ये सीबीएससह दोन चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले जाणार आहेत. Aprilia SXR 125 चार कलर्स ऑप्शनसह उतरवली जाणार आहे. ज्यामध्ये मॅट ब्लू, ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी रेड आणि मॅट ब्लॅक रंगाचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पियाजिओ इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक डिएगो ग्रॅफी यांनी असे म्हटले की, आमच्या खास ग्राहसांटी आता नवीन स्कूटर अप्रिलिया एसएक्सआर 125 बुकिंग करण्याची संधी मिळाली आहे. Aprilia SXR 160 भारतासाठी इटलीमध्ये डिझाइन करण्यात आली आहे.