Bajaj Pulsar 250 Launch: बजाज पल्सर F250 आणि N250 भारतात विक्रीसाठी सज्ज
Bajaj 250 (Photo credit- Twitter)

2021 Bajaj Pulsar F250 आणि Bajaj Pulsar N250 आज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आले आहेत. बजाज ऑटोच्या पल्सरने गेल्या दोन दशकांत भारतात मोठ्या प्रमाणावर - आणि निष्ठावंत - फॅन फॉलोइंग तयार केले आहे. बजाज ऑटोने अलीकडच्या काळात नवीन पल्सर लाँच करण्याआधी मोठ्याप्रमाने प्रचार केला, आणि यापैकी एका बाईकचा टीझर देखील जारी केला आहे. दोन्ही नवीन बाईक गेल्या काही आठवड्यांत भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग करताना दिसल्या आहेत. अखेर या बहुप्रतिक्षित बाइक्स भारतात विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. (हे ही वाचा TVS Apache RTR 160 4V: टिव्हीएस मोटरने Apache RTR 160 4V बाइक केली लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये.)

इंजिन आणि पावर
2021 बजाज पल्सर 250 हे पूर्णपणे नवीन उत्पादन असेल. हे नवीन इंजिन प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात नवीन 250 cc एअर/ऑइल-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन असेल. हे इंजिन सुमारे 26 पीएस पॉवर आणि 22 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर त्यात 6-स्पीड गिअरबॉक्स मिळू शकतो.

लुक आणि डिझाइन
बाह्य स्वरूप आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन 2021 Pulsar 250 मध्ये सर्व-नवीन डिझाइन वापरण्यात आले आहे. सध्याच्या पल्सर श्रेणीच्या बाइक्सच्या अनुरूप असणे अपेक्षित आहे. तथापि, बाह्य डिझाइन अधिक आक्रमक असू शकते कारण ती त्याच्या श्रेणीतील प्रमुख बाइक असेल. त्याच्या काही प्रमुख बाह्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि इंडिकेटर, स्प्लिट सीट, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील मोनोशॉक, अलॉय व्हील्स इत्यादींचा समावेश असेल.
Pulsar 250 ला नेकेड स्ट्रीट फायटर स्टाईल मिळेल, तर Pulsar 250F ला सेमी-फेअर सेटअप मिळेल. दोन्ही मॉडेल्समध्ये समान इंजिन आणि फीचर सेटअप असेल, परंतु बाह्य डिझाइन आणि स्टाइलिंगच्या बाबतीत ते भिन्न असतील.