Ducati Diavel 1260,Diavel 1260 S बाइक भारतात लॉन्च, पाहा फिचर्स, जाणून घ्या किंमत
Diavel 1260 S (Photo Credit: Ducati)

Ducati (डुकाटी) कंपनीने आपल्या बहुचर्चीत राहिलेली बाइक Diavel 1260 अखेर भारतीय बाजारात लॉन्च केली. ही बाइक Ducati Diavel 1260 स्टँडर्ड आणि Diavel 1260 S अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. दोन्ही बाइकची किंमत अनुक्रमे 17.7 लाख आणि 19.25 लाख रुपये इतकी अल्याचे सांगितले जात आहे. मस्क्युलर लूकवाली नवी बाइक बाजारातील सध्यास्थितीतील Diavel या मॉडेलची जागा घेईल. नव्या बाइकमध्ये आगोदरच्या बाइकपेक्षा अधिक फिचर्स आणि दमदार इंजिन असणार आहे.

Ducati Diavel 1260 आणि Diavel 1260 S फिचर्स

  • इंजिन - 1,262cc
  • इंजिनमध्ये 157 bhp इतकी पॉवर आणि 129 Nm टॉर्क निर्माण करण्याची क्षमता
  • इंजिन 6 - स्पीड गिअरबॉक्स
  • Diavel 1260 S बाइकमध्ये क्लचलेस गियर शिफ्टिंगसाठी क्विक शिफ्ट अप/डाउन Evo सिस्टम
  • सिंगल-पीस सीट आणि ट्विन-एलईडी टेल लँप
  • सस्पेंशन आणि ब्रेक कम्पोनेन्ट्स (वेगवेगळी)
  • बाइक कॉर्नरिंग एबीएस युक्त

(हेही वाचा, धक्कादायक! ऑटो क्षेत्रातील लाखो नोकऱ्या धोक्यात, Mahindra & Mahindra ने व्यक्त केली चिंता; सरकारकडे मदतीची याचना)

दोन्ही बाइक्ससाठी बुकींग सुरु

दरम्यान, दोन्ही बाइक्स ब्लॅक फ्रेम आणि सँडस्टोन ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहेत. 1260 S व्हेरियंट मध्ये रेड फ्रेम सोबत थ्रिलिंग ब्लॅक कलरचा पर्यायही उपलब्ध आहे. कंपनीने दोन्ही बाइक्ससाठी बुकींगही सुरु केले आहे. हे बुकींग देशभरात उपलब्ध आहे. डुटाकी कंपनीची डिलरशीप असलेल्या ठिकाणी ही बाइक तुम्ही बुक करु शकता.