Zabeer Hotel Fire (फोटो सौजन्य - X/@AdityaRajKaul)

Bangladesh Violence: बांगलादेशातील हिंसाचारात (Bangladesh Violence) अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आंदोलकांनी अनेक हिंदू मंदिराची तोडफोड केली असून हिंदूच्या घरावरही हल्ले केले आहेत. हिंसक जमावाने देशाच्या दक्षिण पश्चिम भागात असलेल्या प्रसिद्ध झाबीर निवासी हॉटेलला आग (Zabeer Hotel Fire) लावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या आगीमुळे कमीतकमी 25 लोक ठार झाले असून 100 हून अधिक लोक गंभीर भाजले आहेत. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हे हॉटेल शेख हसिना (Sheikh Hasina) यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे खासदार शाहीन चकलादार यांच्या मालकीचे आहे. हिंसक आंदोलक खासदाराला हॉटेलमध्ये शोधत होते. मात्र, आंदोलकांना ते सापडला नाहीत. त्यामुळे हिंसक जमावाने हॉटेल पेटवून दिले. (हेही वाचा -ISKCON Temple Targeted in Bangladesh: बांगलादेशात इस्कॉन मंदिराला करण्यात आलं लक्ष्य; आंदोलकांनी जाळल्या देवतांच्या मूर्ती, हिंदूच्या घरांची तोडफोड)

ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, शाहीन चकलादार हे जेसोर जिल्हा अवामी लीगचे सरचिटणीस आहेत. उपायुक्त अबरारुल इस्लाम यांनी हिंसक आंदोलक आणि जमावाने हॉटेल पेटवल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये तरुण आणि अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  (हेही वाचा -Bangladesh Crisis: बांगलादेशची धुरा सांभाळा; नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद यूनुस यांना आंदोलक विद्यार्थ्यांचे साकडे)

पहा व्हिडिओ - 

वृत्तानुसार, जमावाने हॉटेलच्या फर्निचरचीही तोडफोड केली आहे. याशिवाय, जिल्हा अवामी लीगचे कार्यालय आणि शारशा आणि बेनापोल भागातील आणखी तीन अवामी लीग नेत्यांच्या घरांवरही बेमुदत आंदोलकांनी हल्ला केला. तसेच त्यांच्या घरांची तोडफोड केली.