फियोना सिंपसन (Photo Credit: Facebook)

सोशल मीडियावर एका महिलेची धक्कादायक छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. ही छायाचित्रे पाहून अंगावर रोमांच उभे राहतात. पण, या महिलेतील मातृप्रेमाचे दर्शनही घडवून जातात. सोबतच निसर्ग क्रूर झाला की, त्यापुढे माणूस किती दुबळा ठरतो हेही दाखवून जातात. ही छायाचित्रे आहेत एका २३ वर्षीय आईची. जिने गारपीटीच्या तडाख्यातून आपल्या चिमुकलीला वाचविण्यासाठी शरीराची अक्षरशा: ढाल केली. घटना आहे ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅंड येथील. नुकतेच इथे निसर्गाचे लहरी रुप पहायला मिळाले. इथे गारपीट आणि मुसळधार पाऊस अचानक कोसळला. याच गारपीठीत ही महिला आणि तिची मुलगी सापडली.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकॉस्टींग कॉर्पोरेशनच्या वृत्तानुसार, फियोना सिंपसन असे या महिलेचे नाव आहे. फियोना आणि तिची मुलगी सास कॉफीशॉपमधून परतत होत्या. दोघीही गाडीत होत्या. फियोना सांगते,'माझी गाडी फारशी वेगात चालवू शकत नव्हती. कारण, मला पुढचे काहीच दिसत नव्हते. रस्ताही दिसत नव्हता. मी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. आणि मुलीला छातीशी कवटाळून रस्त्याने पायी जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित, पायीच आपण लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचू, असा माझा विचार होता. मी हा विचार करत होते तोपर्यंत बर्फाचा एक मोठा तुकडा गाडीच्या काचेवर पडला. काच तुटली. आता. माझ्या आणि मुलीसमोरचा धोका आणखी वाढला. भीती तर वाटत होती. पण, घाबरण्याची ही वेळ नव्हती. '

पुढे बोलताना फियोना सांगते, '.. आता माझ्याकडे पर्यायच उरला नाही. मी, गाडीच्या मागच्या सीटवर गेले आणि मुलीच्या अंगावर पडून राहिले. माझ्या पाठीवर थंड गारांचा वर्षा होत होता. छोट्या मोठ्या आकारांच्या आकाशातून पडणाऱ्या गारा. त्यामुळे पाटीला होणाऱ्या वेदाना. मला सूचतच नव्हते काही. मला वाटले आता मी संपले. निसर्ग रागावला होता. पण, क्रुर नव्हता झाला. मी वाचले. ' (हेही वाचा, लग्न कधी करतेय? या प्रश्नपासून सुटका मिळवण्यासाठी ऑक्सफर्डच्या विद्यार्थिनीने केलं स्वतःशीच लग्न)

दरम्यान, 'फियोनाने गारांमुळे झालेल्या जखमा दाखवणारा आपल्या उगड्या पाठीची छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली आहेत. सोबत पोस्ट लिहिली आहे की, गारपीठ सुरु असताना कधीही गाडी चालवू नये. ते प्रचंड धोकादायक आहे.' तिची झायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.