Montevideo Maru Japanese Ship: दुसरे महायुद्ध World War II) म्हटले की आठवतो तो ऐतिहासिक नरसंहार. बॉम्बचा वर्षाव आणि हिरोशिमा, नागासाकी सारखी बेचिराख झालेली शहरं. दुसऱ्या महायुद्दाच्या आठवणी इतिहासांच्या पानापानांवर वेदना देतात. याच महायुद्धाची साक्षीदार असलेली एक बोट तब्बल 80 वर्षांनी सापडली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 'व्हॉइस ऑफ अमेरिकाने'चा हवाला देत वृत्तसंस्था एएनआने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या महायुद्धात सुमारे 1,000 हून अधिक लोकांसह बुडलेले जपानी वाहतूक जहाज अखेर सापडले आहे. या निमित्ताने या जहाजाचा इतिहासही आपसुकच पुढे आला आहे.
मॉन्टेव्हिडिओ मारू (Montevideo Maru) हे जपानी जहाज. ज्यावर जपान्यांनी 1942 मध्ये पापुआ न्यू गिनीमध्ये पकडले सुमारे 850 युद्धकैदी आणि सुमारे 200 नागरिक होते. जहाजावर कोण आहे याची पुरेशी कल्पना नसताना USS Sturgeon या अमेरिकन पाणबुडीने हे जहाज टॉर्पेडो केले होते. जहाजावरील लोकांची ओळक उघड होण्यापूर्वीच दोस्त राष्टांच्या सैन्याने हे जहाज यशस्वीरित्या बुडाले असे घोषीत केले. दरम्यान, फिलिपाइन्सच्या दक्षिण चीन समुद्रात या आठवड्याच्या सुरुवातीला हे जहाज सापडले. या जहाजाच्या शोधासाठी ऑस्ट्रेलियन संरक्षण विभाग, ऑस्ट्रेलियाच्या सायलेंटवर्ल्ड फाउंडेशनचे सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि डच खोल-समुद्र सर्वेक्षण कंपनी फुग्रोचे तज्ञ यांनी संयुक्त मोहीम सुरु केली होती. (हेही वाचा, What is NATO? जाणून घ्या नक्की काय आहे 'नाटो' संघटना, त्याचा उद्देश आणि सध्या किती देश आहेत सामील)
संयुक्त शोधमोहीमेत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस या जहाजासाठी फिलिपाइन्सच्या किनारपट्टीवर शोध मोहीम सुरू झाली. दोन आठवड्यांच्या आत, जहाजाची ओळख अधिकृतपणे सत्यापित होण्यापूर्वी मॉन्टेव्हिडिओ मारूचे सकारात्मक दर्शन घडले. शोध पथकाच्या अनेक वर्षांच्या संशोधनाचा आणि तयारीचा हा कळस होता. 'व्हॉइस ऑफ अमेरिका'च्या मते या जहाजावरील सुमारे 1,000 ऑस्ट्रेलियन लोक आपत्तीत मरण पावले. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाच्या पाठिंब्याने सागरी पुरातत्व आणि इतिहास आणि फुग्रो यांना समर्पित असलेल्या सायलेंटवर्ल्ड फाऊंडेशनने संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेत जहाजाचे अवशेष सापडले.
ट्विट
For more than 80 years, hundreds of Australian families have waited for news of the Montevideo Maru.
This week, thanks to an extraordinary search effort, the ship’s final resting place has been discovered. pic.twitter.com/NSn3bNjJXm
— Richard Marles (@RichardMarlesMP) April 21, 2023
जहाज सापडल्यानंतर युद्धाच्या आठवणींनी डजनहून अधिक देश दु:खी झाले. ज्यांना या युद्धाने प्रभावित केले होते. खास करुन डेन्मार्क, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स तसेच जपानमधील लोक जहाजावरील बळी होते. दरम्यान, मॉन्टेव्हिडिओ मारूमधून कोणतीही वस्तू किंवा मानवी अवशेष काढले जाणार नाहीत, असे VoA ने म्हटले आहे.
ट्विट
The 850 Australian service members on board were never forgotten.
We will remember them.
— Richard Marles (@RichardMarlesMP) April 21, 2023
जहाज सापडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनी ट्विट करुन भावना व्यक्त करताना म्हटले की, "80 वर्षांहून अधिक काळ, शेकडो ऑस्ट्रेलियन कुटुंबे मॉन्टेव्हिडिओ मारूच्या बातमीची वाट पाहत आहेत. या आठवड्यात, एका विलक्षण शोध प्रयत्नामुळे जहाजाच्या अंतिम विश्रांतीसाठी जागा शोधली आहे. बोर्डवरील 850 ऑस्ट्रेलियन सेवा सदस्यांना कधीही विसरले नाही. आम्ही त्यांना लक्षात ठेवू'.