World COVID-19 Cases Update: जगभरात कोरोनाचा हाहाकार! कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 कोटींच्या पार, तर मृतांचा आकडा 9 लाखांच्या पलीकडे
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून Worldometer दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ही 3 कोटींच्या पार गेली आहे. जगात आतापर्यंत 3 कोटी 6 लाख 97 हजार 734 कोरोनाचे रुग्ण (COVID-19 Positive Cases) आढळले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 9 लाख 56 हजार 446 वर (COVID-19 Death Cases) पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे जगात आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 39 हजार 889 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19 Recovered Cases) केली आहे.

ही संख्या पाहता जगभरातील कोरोनाची भयाण वास्तव समोर येत आहे. जगात कोरोनाच्या सर्वाधिक कोरोना बाधितांच्या संख्येच्या यादीत अमेरिका देश प्रथम स्थानावर असून दुस-या स्थानावर भारत देश आहे. अमेरिकेत कोरोना बाधितांची एकूण संख्या 69,25,941 वर पोहोचली आहे. तर भारतात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 53,08,015 इतका झाला आहे. सध्या भारतात 10,13,964 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  आतापर्यंत 42,08,432 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. दुर्देवाची बाब म्हणजे आतापर्यंत देशात 85,619 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. त्यापाठोपाठ ब्राझील, रशिया, पेरू देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. Global Economic Recovery: जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी लागू शकतात 5 वर्षे; वीस वर्षांत प्रथमच वाढेल गरीबी दर- World Bank Chief Economist Carmen Reinhart

दरम्यान आज चीनमधून त्याबद्दल एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाकडून (Chinese Foreign Ministry) Wang Wenbin यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड 19 विरूद्धच्या संभाव्य कोविड 19 लसीचे चीन आणि United Arab Emirates मध्ये तिसर्‍या टप्प्यातील अहवाल सकारात्मक आले आहेत. United Arab Emirates मध्ये सोमवारी (14 सप्टेंबर) ला चीन निर्मित कोविड 19 च्या लसीला Emergency Approval देण्यात आले आहे. दरम्यान तेथे लसीच्या मानवी चाचणीला सहा आठवड्यांच्या प्रयोगानंतर समोर आलेल्या निकालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.