जगभरात अशा अनेक प्रजाती आणि जमाती (Tribes) आहेत ज्यांनी आपल्या पूर्वीच्या प्रथा, परंपरा, पद्धती अजूनही कायम ठेवल्या आहेत. अनेक जमातींमध्ये पोशाखापासून ते खाद्यपदार्थ, धार्मिक विधींपर्यंत अनेक विचित्र प्रथा आहेत. यातील काही प्रथा अशा आहेत, ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणूनच अशा प्रथांना कु-प्रथा किंवा दुष्ट प्रथा म्हणतात. आज आम्ही अशाच एका प्रथेबद्दल सांगणार आहोत. इंडोनेशियातील (Indonesia) 'दानी' या जमातीमध्ये (Dani Tribe) कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास घरातील महिलेचे बोट कापले जाते.
या प्रथेला इकिपलिन (Ikipalin) म्हणतात. सरकारने या प्रथेवर वर्षापूर्वी बंदी घातली असली तरी, महिलांचे बोटे कापलेले हात ही प्रथा अजूनही सुरु असल्याची साक्ष देतात. इंडोनेशियातील जयविजया प्रांतात दानी जमात राहते. जिथे आजही महिलांसाठी अत्यंत क्रूर परंपरा पाळल्या जातात. यातील एका परंपरेनुसार येथील कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मृत्यूनंतर महिलांना हाताच्या बोटांचा वरचा भाग कापावा लागतो. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी हे करणे आवश्यक आहे, अशी यामागची धारणा आहे.
महिलांची बोटे कुऱ्हाडीने बोटे कापली जातात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारे दुःख कमी करण्यासाठी ही परंपरा आजही पाळली जाते. या प्रथेसाठी महिलांचे बोट प्रथम दोरीने बांधले जाते. मग ते कुऱ्हाडीने कापले जाते. मग ते बोट जाळले जाते. कुऱ्हाडीने बोटे कापणे ही विकृत प्रथा लक्षात घेऊन इंडोनेशियन सरकारने त्यावर बंदी घातली आहे. परंतु दुःखद बाब म्हणजे अजूनही ही प्रथा तशीच चालू आहे. (हेही वाचा: Medieval Vampire: पोलंडमध्ये सापडला पुरातन सांगाडा; लोकांना वाटले हा तर मध्ययुगीन काळातील 'व्हॅम्पायर')
दरम्यान, जगभरात अशा अनेक स्थानिक परंपरा आहेत ज्या बंदीनंतरही समाजातील लोक त्या पाळतात. सरकार याबाबत कठोर आहे, अशा परंपरांना खूप विरोधही झाला आहे मात्र त्या अजूनही थांबल्या नाहीत. अशा वाईट प्रथा आणि दुष्ट विधी फक्त स्त्रियांसाठीच का?, असा प्रश्नही अनेकदा उभा राहिला आहे.