स्पेनमधील (Spain) एका स्मशानभुमीत एक स्त्री शरीराचा पूरातन सांगाडा आढळून आला आहे. स्पेनमधील एका गावात स्मशानभूमिचे उत्खनन सुरु होते. त्यात हा सांगाडा आढळला. स्थानिकांनी दावा केला की हा सांगाडा त्या काळातील व्हॅम्पायरचा (Medieval Vampire) असू शकतो. अभ्यासकांना या सांगाड्यावर एक विशिष्ट प्रकारचा विळा आढळून आला. हा विळा अशा पद्धतीने ठेवण्यात आला होता की, जर त्या व्यक्तीने (सांगाडा) उठण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गळा कापला जावा. निकोलस कोपर्निकस युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॅरियस पोलिंस्की यांनी या सांगाड्याबाबत माहिती देताना सांगितले की, सांगाड्याच्या गळ्यावर ठेवण्यात आलेला विळा हा सपाट नव्हता. तो मानेवर अशा पद्धतीने ठेवण्यात आला होता की, मृत व्यक्तीने उठण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित शिर कापले गेले असते किंवा जखमी झाले असते.
युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, सांगाड्याच्या डोक्यावर रेशमी टोपी होती. जी सांगाड्याची त्या काळची उच्च सामाजिक स्थिती दर्शवते. सांगाड्याच्या जबड्यातून एक दातही बाहेर आला होता. बाहेर पडलेला दात. विचित्रपणे, तिच्या एका पायाचे बोट देखील कुलप लावून सुरक्षित केले होते. (हेही वाचा, पुणे: 17 वर्षापूर्वी दोन मित्रांनी केलेल्या हत्येचे गूढ उकलले, या वर्षी करण्यात आले सांगाड्यावर अंत्यसंस्कार)
प्रोफेसर पोलिंस्की यांच्या हवाल्याने डेली मेलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कदाचित मृत व्यक्तीस दफन करण्याची त्या काळची तशी पद्धत असू शकते. मृतदेह अधिक सूरक्षीत राहावा यासाठी त्याच्या पायाचे बोट कुलूपबंद केले जात असावे. तसेच, त्याच्या गळ्यावर विळा ठेवल्यास त्याची निश्चीत जागा बदलली तर गळा कापला जावा असा हेतू त्यामागे असावा. तसेच, संबंधीत व्यक्ती परत न येण्याचा सुरक्षीत उपाय म्हणूनही असे केले जात असावे असे पोलिंस्की म्हणाले.
ग्रेगोरिका, दक्षिण अलाबामाविद्यापीठात सक्रीय असेलेल डॉ लेस्ले म्हणाले 'मध्ययुगीनोत्तर काळातील लोकांना रोग कसा पसरतो हे समजत नव्हते. त्यामुळे ते साथीच्या रोगांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याऐवजी, कॉलरा आणि त्यामुळे होणारे मृत्यू अलौकिक - या प्रकारात समजत असत. या सर्व रोग, आजारांना ते खास करुन व्हॅम्पायर्सना जबाबदार धरत. त्या काळात अशी समजूत होती की, जमीनीत पुरलेले प्रेत परत येते आणि ते राक्षस बनते. हे राक्षस म्हणजेच व्हॅम्पायर किंवा झोंबी. त्यामुळे मृतदेहांना दफन करताना त्याकाळात विशेष काळजी घेतली जात असावी.