बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बॉसची हत्या केली म्हणुन महिलेला फाशी
Hanging (Photo Credits: Representative Image)

बलात्काराची (Rape Case)  घटना समोर येताच आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यासाठे सौदी अरेबियाचे (Saudi Arabia)  नेहमीच कौतुक होत असते, भारतात सुद्धा असाच कायदा राबवण्यात यावा अशी मागणी ही आपण अनेकदा ऐकली असेल , पण आता समोर आलेल्या घटनेत एका महिलेने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न  करणार्‍याची हत्या केल्याने तिला चक्क फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर या महिलेला फासावर चढवण्याआधी तिच्या कुटुंबियांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. या महिलेने आत्मबचावासाठी बलात्कार करू पाहणार्यावर हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला मात्र हा प्रकार महिलेवरच उलटून तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, एका बाळाची आई असणाऱ्या तुती तुरसीलवाती या इंडोनेशियन महिलेला सोमवारी फाशी देण्यात आली. सौदी अरेबियातील मक्का प्रांतातील तायफ शहरात तुतीला फाशी देण्यात आली. तुतीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्यास बॉसवर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या बॉसचा मृत्यू झाला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सौदीत झालेल्या सुनावणीत तुतीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नाशिक: लग्नाला नकार दिल्याने तिने स्वत:ला पेटवून घेतले; लासलगाव जळीत कांडातील आरोपीचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या शिक्षेची अंमलबजावणी करताना सौदी सरकारने या महिलेच्या नातेवाईकांना अथवा इंडोनेशियाच्या दूतावासाला कळवले नसल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर इंडोनेशियात सौदी सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा चार इंडोनेशियन नागरिकांना सौदीमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ज्याबाबत इंडोनेशियन दूतावासाला काहीही माहिती देण्यात आली नव्हती.