Legal Battle for Bitcoin: एका महिलेची नजरचुक तिच्या एक्स बॉयफ्रेंडला तब्बल 5,900 कोटी रुपयांना पडली आहे. या महिलेने तिचा माजी प्रियकर असलेल्या जेम्स हॉवेल्स याचे 569 मिलीयन पौंड (Million Pounds) किमतीचे बिटकॉईन हार्ड ड्राईव्ह (Cryptocurrency Hard Drive) कचऱ्यात फेकल्याची (Lost Bitcoin) कबुली दिली आहे. आपल्याकडून हे कृत्य केवळ नजरचुकीने घडल्याचे तिने म्हटले आहे. त्या या कृत्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या आर्थिक अपघाताची घटना पुढे आली आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केटच्या इतहासातील अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या एक म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.
काय आहे प्रकरण?
हॉवेल्सच्या दोन किशोरवयीन मुलांची आई, हाल्फिना एडी-इव्हान्स हिने एका कायदेशीर चौकशीत सांगिले की, आपण आपला आगोदचा प्रियकर हॉवेल्स याने केलेल्या विनंतीवरुनच घर साफ केले. या घटनेला आता एक दशक उलटून गेले आहे. त्याच वेळी केलेल्या साफसफाईत आपण तो पेनड्राईव्ह फेकून दिला. आपल्याला त्या पेनड्राईव्हमध्ये बिटकॉईन आहे की आणि काय आहे याची किंचितही कल्पना नव्हती. त्यामुळे आपण तो पेनड्राईव्ह कचऱ्यात फेकून दिला. त्यामुळे तो गमावणे यात माझा काहीच दोष नव्हता, असेही तिने म्हटले. (हेही वाचा, Fraud: बिटकॉइनवर शिक्षकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला बेंगळुरूमधून अटक, गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने माटुंगातील महिलेला 2.47 लाखांचा गंडा)
हजारो टन कचऱ्यात बिटकॉईन
दरम्यान, हॉवेल्स याने 2009 मध्ये घेऊन ठेवलेल्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन्सचा शोध घेतला खरा.. पण त्याच्या हेही लक्षात आले की, हे सर्व बिटकॉईन्स असले तरी त्यांची डिजिटल किल्ली असलेली हार्ड ड्राईव्ह हरवलीआहे. त्यामुळे ती मिळाल्याशिवाय या बिटकॉईन्सला काहीच अर्थ नाही. त्याने शोध घेऊनही तो ड्राईव्ह भेटला नाही. सांगितले जात आहे की, हा पेनड्राईव्ह वेल्सच्या न्यूपोर्ट येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ही हा पेनड्राईव्ह दबला गेला आहे. या ठिकाणी तब्बल 100,000 टन कचरा आहे. त्यामुळे यात आता तो पेनड्राईव्ह शोधणे प्रचंड कठीण काम आहे. आणि तो सापडला तरी तो सुस्थितीत असेल याची सूतराम शक्यता नाही. (हेही वाचा, Fraud: बिटकॉइनवर शिक्षकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला बेंगळुरूमधून अटक, गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने माटुंगातील महिलेला 2.47 लाखांचा गंडा)
बिटकॉईन मिळविण्यासाठी कायदेशीर लढाई
हॉवेल्सने हार्ड ड्राइव्ह पुनर्प्राप्त करण्याच्या त्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणल्याचा आरोप करत न्यूपोर्ट सिटी कौन्सिलविरुद्ध 4,900 कोटी रुपयांचा (495 दशलक्ष पौंड) खटला दाखल केला आहे. कौन्सिलने उत्खननास परवानगी देण्यास नकार दिल्याने त्याला त्याच्या वाढत्या क्रिप्टोकरन्सी संपत्तीत प्रवेश गमवावा लागला आहे, असा त्याचा दावा आहे. फॉर्च्यूनला दिलेल्या निवेदनात हॉवेल्स म्हणाला की, "या खजिन्याचा शोध संपणार नाही. कारण त्याचे मूल्य दररोज वाढत आहे ".
दुसऱ्या बाजूला न्यूपोर्ट सिटी कौन्सिलने प्रवक्त्याच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या पर्यावरणीय परवान्याखाली उत्खनन शक्य नाही आणि अशा कामाचा या क्षेत्रावर मोठा नकारात्मक परिणाम होईल. कोणाच्याही संपत्तीपेक्षा आम्हाला नागरिक आणि पर्यावरणाचे आरोग्य महत्त्वाचे आहे".
मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम
दरम्यान, जेम्स हॉवेल्स याची माजी प्रेयसी एड्डी-इव्हान्सने तिला परत मिळालेल्या संपत्तीचा कोणताही वाटा नको असल्याचे सांगून चालू असलेल्या लढाईपासून स्वतःला दूर केले आहे. मला आशा आहे की त्याला ते सापडेल, मला त्यातील एक पैसाही नको आहे. त्याने त्याबद्दल बोलणे थांबवावे अशी माझी इच्छा आहे, अशी ती म्हणाली. या अग्निपरीक्षेचा हॉवेल्सच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे, असेही ती पुढे म्हणाली.