एका प्रेयसीने प्रियकराची हत्या करुन त्याची लज्जतदार बिर्याण बनवून लोकांना खाण्यास दिल्याची विचित्र घटना घडली आहे. तसेच या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
मोरक्कोमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे तिचा प्रियकरासोबत 7 वर्ष प्रेमसंबंध होते. तसेच हे दोघे एकत्र खूप काळ एकमेकांसोबत एकाच घरात राहत होते. मात्र प्रियकराचे दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचे ठरविले होते. या प्रकरणाची प्रेयसीला कल्पना आली त्यावेळी रागाच्या भरात तिने त्याची हत्या केली. एवढच नसून प्रियकराच्या शरीराचे तुकडे कापून ते मिक्सरमधून काढले. मात्र या आरोपी महिलेने हे तुकडे टाकून न देता शिजवले आणि त्याची बिर्याणी बनवली. तसेच ही बिर्याणी तिच्या इथे काम करणाऱ्या कामगार वर्गाला खाण्यासाठी दिली.
मात्र प्रियकराच्या भावाने तो हरवला असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. परंतु या घटनेचा तपास करताना आरोपी महिलेच्या घरातील मिक्सरच्या भांड्यामध्ये मानवी दात आढळून आला. त्यानंतर महिलेने आपला गुन्हा कबूल करुन आपणच प्रियकराचा सूड घेण्यासाठी हे कृत केल्याचे सांगितले आहे.