
Ukraine-Russia Crisis: रशिया आणि युक्रेनमधील वादाचे आता युद्धात रूपांतर झाले आहे. या दोन देशांव्यतिरिक्त संपूर्ण जगाच्या नजरा युरोप आणि अमेरिकेवर आहेत. पण रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामागील खरे कारण तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. याआधी, रशियाच्या विघटनानंतर वेगळे झालेल्या देशांपैकी युक्रेन देखील एक होता. रशियासोबतच त्यावेळी क्रिमिया देखील होता, जो 2014 मध्ये रशियाने आपल्या ताब्यात घेतला होता. याशिवाय रशियाचे बहुसंख्य समर्थक युक्रेनच्या डॉनबास, लुहान्स्क आणि डोनेत्स्कमध्ये आहेत. युक्रेनच्या बाहेर बोलायचे झाले तर बेलारूस, जॉर्जिया पूर्णपणे रशियासोबत आहेत. याचा अर्थ असाही होतो की युक्रेन पूर्णपणे रशियाने वेढलेला आहे. आता कोणत्या कारणांमुळे रशियाला युक्रेनवर हल्ला करण्याचे पाऊल उचलावे लागले त्याबद्दल जाणून घेऊयात.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नाटो संघटनेत युक्रेनचा समावेश करण्यासाठी अमेरिकेने केलेली कसरत. अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या संस्थेमध्ये 30 देशांचा समावेश आहे, त्यापैकी बहुतेक युरोपमधील आहेत. मात्र, यातील बहुतांश सैनिक हे अमेरिकेतील आहेत. रशियावर दबाव आणि जुन्या वादांमुळे अमेरिका अशा प्रकारची कसरत सातत्याने करत आहे. अमेरिकेने यापूर्वीही रशियावर निर्बंध लादून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांची ही युक्ती आजवर कामी आली नव्हती. आता त्याला हे काम युक्रेनच्या मदतीने करायचे आहे. युक्रेन NATO सोबत गेल्यास त्याचे सैन्य आणि शस्त्रास्त्रांच्या जोरावर अमेरिका त्याचे नुकसान करण्यात अंशतः यशस्वी होऊ शकते, अशी रशियाची चिंता आहे. (वाचा - Ukraine Russia Crisis: रिपोर्टरने रशिया-युक्रेन संकट 6 भाषांमध्ये केले कव्हर; सोशल मीडियावर व्हायरल होताय 'हा' व्हिडिओ)
नॉर्ड स्ट्रीम 2 पाइपलाइन -
या हल्ल्याचे दुसरे कारण म्हणजे यूएस आणि पाश्चात्य-युरोपियन देशांनी नॉर्ड स्ट्रीम 2 पाइपलाइन रोखली आहे. या प्रकल्पावर रशियाने अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. याद्वारे रशियाला फ्रान्स, जर्मनीसह संपूर्ण युरोपला गॅस आणि तेलाचा पुरवठा करायचा आहे. पूर्वी या पाइपलाइनमधून हा पुरवठा युक्रेनमधून होत असे. यासाठी रशिया दरवर्षी युक्रेनला लाखो डॉलर्स देत असे. नवीन पाइपलाइन बांधल्यास युक्रेनची कमाई नष्ट होईल. युक्रेनच्या रशियापासून वेगळे होण्याच्या एका प्रमुख कारणात याचाही समावेश आहे.
तिसरे कारण म्हणजे रशियाला युक्रेनने कोणत्याही प्रकारे अमेरिकेसोबत जाऊ नये असे वाटते. याचे एक मोठे कारण म्हणजे रशियाचे युक्रेनशी भावनिक नाते आहे. युक्रेनच्या मातीतूनच रशियाचा पाया रचला गेला. रशियाची ओळख, उरल पर्वतरांगही युक्रेनमधून जाते. अमेरिका आणि रशिया यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. शीतयुद्धानंतरही परिस्थिती बदललेली नाही. दुसरीकडे, रशियाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. रशियाला फक्त आपली प्रतिष्ठा राखायची आहे आणि त्याची बदनामी करायची नाही.